पुणे - शहरातील नव्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा कमी होत असल्याचे दिलासादायक चित्र गेल्या सात दिवसापासून दिसत आहे. मंगळवारी २७ एप्रिलला हा ट्रेंड कायम असल्याचे समोर आल्याने लॉकडाऊनसदृश परिस्थितीचा परिणाम होताना दिसत आहे. मंगळवारी २७ एप्रिलला दिवसभरात ३८७१ पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ तर दिवसभरात ६१५९ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
त्यामुळे नव्या सापडणाऱ्या रुग्ण संख्येपेक्षा डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या जवळपास दुप्पट झाल्याचे आशादायक चित्र आहे. मंगळवारी पुण्यात कोरोनाबाधित ८२ रुग्णांचा मृत्यू त्यातले २५ रूग्ण पुण्याबाहेरील होते. तर १३६८ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या ४ लाख६५२६ इतकी झाली आहे. सध्या पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या ४५०७५ इतकी आहे.
शहरात एकूण मृत्यू ६६११ इतके झाले आहेत तर आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज ३ लाख ५४ हजार८४० आहेत शहरात आज केलेल्या १६६३० नमुन्यांची (स्वॅब) तपासणी करण्यात आली.