पुणे - शहरात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढतच आहे, शनिवारी दिवसभरात पुण्यात 3 हजार 111 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर दिवसभरात 1094 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आज दिवसभरात कोरोनामुळे 21 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतामध्ये 5 रुग्ण हे पुण्याबाहेरील आहेत.दरम्यान पुण्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 2 लाख 32 हजार 494 वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत कोरोनामुळे 5 हजार 33 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या पुण्यात 20 हजार 889 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
पुणे विभागाचा विचार केला तर विभागातील 6 लाख 21 हजार 881 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, विभागात कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या 6 लाख 76 हजार 826 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 38 हजार 237 इतकी आहे. आतापर्यंत कोरोनामुळे विभागात 16 हजार 708 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.47 टक्के इतके असून, कोरोनातून बरे होण्याचे प्रमाण 91.88 टक्के इतके आहे.
पुणे जिल्ह्यातील आकडेवरी
जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा एकूण आकडा 4 लाख 58 हजार 597 वर पोहोचला आहे. त्यापैकी 4 लाख 16 हजार 297 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर सध्या 32 हजार 882 रुग्णांवर उपचार सुरू असून, कोरोनामुळे 9 हजार 418 जणांचा मृत्यू झाला आहे.
सातारा जिल्ह्यातील आकडेवारी
जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा एकूण आकडा 61 हजार 737 वर पोहोचला आहे. त्यापैकी 57 हजार 777 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर सध्या 2 हजार 84 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. कोरोनामुळे आतापर्यंत एकूण 1 हजार 876 जणांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्ह्यातील आकडेवारी
सोलापूर जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा एकूण आकडा 55 हजार 949 वर पोहोचला आहे. त्यापैकी 51 हजार 867 रुग्णांनी मात केली आहे. तस सध्या 2 हजार 195 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर आतापर्यंत 1 हजार 887 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्ह्यातील आकडेवारी
जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा एकूण आकडा 49 हजार 417 वर पोहोचला आहे. त्यापैकी 46 हजार 979 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून, 667 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत एकूण 1 हजार 771 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील आकडेवारी
कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा 51 हजार 126 वर पोहोचला आहे. त्यापैकी 48 हजार 961 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर आतापर्यंत 1 हजार 756 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.