ETV Bharat / city

कामावरुन काढल्याच्या रागातून लॉज मालकाची दिली सुपारी, तिघांना अटक

मालकाने कामावरून काढून टाकल्याने नेहमी लॉजवर उतरणाऱ्या दोघांना नोकरानेच सुपारी दिल्याचे तपासात समोर आले आहे.

author img

By

Published : Apr 5, 2019, 3:11 PM IST

पुणे - कॅम्प परिसरातील राजतिलक लॉजच्या मालकाच्या डोक्यात हातोड्याचे वार करून खुनाचा प्रयत्न करणारे दोघेजण आणि खुनाची सुपारी देणारा, असे मिळून तिघांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे. मालकाने कामावरून काढून टाकल्याने नेहमी लॉजवर उतरणाऱ्या दोघांना नोकरानेच सुपारी दिल्याचे तपासात समोर आले आहे.

रविंद्र शामकुमार अगरवाल (वय ७५) यांच्या खुनाचा प्रयत्न करण्यात आला होता. शरीफ आबेदअली शेख (वय २२) व मकबुल निजामुल शेख (वय २१) अशी खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोघांची नावे आहेत. तर, अमरसिंग जोहरसिंग कुवर (वय ६०) याने खून करण्याची सुपारी दिली होती.

अमरसिंह कुवर हा काही वर्षांपासून राजतिलक लॉजमध्ये कामाला होता. त्याच्यावर अगरवाल हे वारंवार शिवीगाळ करत. जेवायला देत नव्हते. तसेच जास्त काम करून घेत पगार कमी देत होते. काही दिवसांनी त्यांनी अमरसिंहला कामावरून काढून टाकले. त्यामुळे तो अगरवाल यांच्यावर चिडला होता. त्यामुळे त्याने अगरवाल यांचा खून करण्याचा निर्णय घेतला. मकबुल आणि शरीफ शेख या दोघांचे लॉजवर सतत येणे जाणे असायचे. त्याच ओळखीतून त्याने दोघांना बोलवून अगरवाल यांना मारण्यासाठी १५ हजार रुपयांची सुपारी दिली.

रविंद्र अगरवाल यांचा कॅम्प परिसरात राजतिलक लॉज आहे. बुधवारी दुपारी दोघेजण त्यांच्याकडे आले. त्यांनी बोलताना झालेल्या वादातून अगरवाल यांच्या डोक्यात हातोड्याने वार करत त्यांचा खून करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर, दोघे मारेकरी तेथून पसार झाले होते. या घटनेत अगरवाल गंभीर जखमी झाले होते. लष्कर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलिसांनी तपास सुरु केल्यानंतर अगरवाल यांच्यावर हल्ला करणारे संशयित मुंबईत जव्हेरी बाजार येथे जाणार असल्याची माहिती पोलीस शिपाई राकेस खुनवे यांना मिळाली. सहायक पोलीस निरीक्षक जयवंत जाधव आणि कर्मचाऱ्यांनी मुंबईत जावून दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली. तेव्हा त्यांना लॉजमध्येच काम करणारा अमरसिंह कुवर याने अगरवाल यांना जीवे मारण्याची सुपारी दिल्याचे समोर आले. तिघांनाही पुढील तपासासाठी लष्कर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

Intro:पुण्यातील कॅम्प परिसरातील राजतिलक लॉजच्या मालकाच्या डोक्यात हातोड्याचे वार करून खुनाचा प्रयत्न करणारे व त्यांच्या खुनाची सुपारी देणारा अशा तिघांना पुणे पोलिसांनी जेरबंद केले. मालकाने कामावरून काढून टाकल्याने नेहमी लॉजवर उतरणाऱ्या दोघांना नोकरानेच सुपारी दिल्याचे तपासात समोर आले आहे.

पोलिसांनी याप्रकरणी शरीफ आबेदअली शेख (२२) व मकबुल निजामुल शेख (२१) अशी खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोघांची नावे आहेत. पोलिसांनी त्यांना अटक केलीय. तर अमरसिंग जोहरसिंग कुवर (६०) असे खुनाची सुपारी दिल्याप्रकरणी अटक केलेल्याचे नाव आहे. रविंद्र शामकुमार अगरवाल (७५ ) यांच्या खुनाचा प्रयत्न करण्यात आला होता. Body:रविंद्र अगरवाल यांचे कॅम्प परिसरात राजतिलक लॉज आहे. बुधवारी दुपारी दोन जण त्यांच्याकडे आले. त्यांनी बोलता बोलता झालेल्या वादातून अगरवाल यांच्या डोक्यात हातोड्याने वार करून त्यांचा खून करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर मारेकरी पसार झाले होते. या घटनेत अगरवाल गंभीर जखमी झाले होते. लष्कर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

त्यानतंर याठिकाणी वरिष्ठ अधिकारी व गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली. आणि तपास सुरु केला. त्यावेळी अगरवाल यांच्यावर हल्ला करणारे संशयित मुंबईत जव्हेरी बाजार येथे जाणार असल्याची माहिती पोलीस शिपाई राकेस खुनवे यांना मिळाली. त्यानतंर युनीट २ च्या पथकातील सहायक पोलीस निरीक्षक जयवंत जाधव व कर्मचाऱ्यांनी मुंबईत जाऊन दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली. तेव्हा त्यांना लॉजमध्येच काम करणारा अमरसिंह कुवर याने अगरवाल यांना जीवे माऱण्याची सुपारी दिल्याचे समोर आले. तिघांनाही पुढील तपासासाठी लष्कर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.Conclusion:का दिली सुपारी ?
अमरसिंह कुवर हा मागील काही वर्षांपासून राजतिलक लॉजमध्ये कामाला होता. त्याला अगरवाल हे वारंवार शिवीगाळ करतात.जेवायला देत नाहीत. तसेच जास्त काम करून घेत पगार कमी देतात. त्यानंतर काही दिवसांनी कामावरून काढून टाकले.त्यामुळे तो अगरवाल यांच्यावर चिडला होता. त्यामुळे त्यांना संपविण्याचा निर्णय घेतला. मकबुल व शरीफ शेख दोघांचे लॉजवर सतत येणे जाणे असायचे. त्याच ओळखीतून त्याने दोघांना बोलवून अगरवाल यांना मारण्यासाठी त्यांना १५ हजार रुपयांची सुपारी दिली. त्याचे अडवान्स म्हणून ५ हजार रुपये दिले.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.