पुणे - महाराष्ट्रात आणि संपूर्ण भारतात शिवजयंती ( Shivaji Maharaj Jayanti 2022 ) दोन वेळा साजरी केली जाते. पहिली शिवजयंती ही तारखेनुसार आणि दुसरी शिवजयंती ही तिथीनुसार. पुण्यात शिवजयंती निमित्त एका शिवभक्ताने पर्वती येथील जनता वसाहतीमध्ये ( Five thousand flag Janta Vasahat ) साधारणत: 5 हजार भगवे झेंडे लावून छत्रपती शिवाजी महाराज यांच्याप्रति आपला आदर व्यक्त केला. सुरेश लोखंडे असे या शिवभक्ताचे नाव आहे.
शिवाजी महाराज हे कोणत्या धर्माचे समर्थक नव्हते. तर, ते सर्व हिंदू, मुस्लीम, शिख, इसाई या सर्वांना एकत्र धरून हिंदवी स्वराज्य घडविण्यासाठी नेहमी पुढाकार घेत होते. सुरेश लोखंडे यांनी झेंडे लावून आपल्या भावना व्यक्त केल्या. आज समाजाला शिवाजी महाराजांचा इतिहास समजावा, त्यांच्याबद्दल आदर निर्माण व्हावा आणि शिवाजी महाराजांचे कार्य चालत राहावे यासाठी प्रेरणा देण्यासाठी, शिवाजी महाराजांची प्रतिकृती आणि त्यांच्या साथिदारांनी त्यांना कशा प्रकारे स्वराज्यनिर्मितीसाठी साथ दिली, प्राणांची बाजी लावली आणि स्वराज्य रक्षणासाठी त्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली, याचा इतिहास लोकांपर्यंत पोहचावा यासाठी शिवजयंतीच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.