ETV Bharat / city

Thieves Police Face To Face : पुण्यात पोलीस चोरटे समोरासमोर...पुढे असा झाला थरार - Pune Crime Latest News

पुण्यातील मार्केटयार्ड येथील एका हायक्लास सोसायटी असलेल्या चाफळकर नगरमध्ये बुधवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास एक थरार पाहायला मिळाला. या सोसायटीत तीन ते चार चोरटे घुसले. आणि याची माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी चोरांचा प्रतिकार करण्यास सुरुवात केली. यादरम्यान चोरट्यांनी कोयता आणि धारदार शस्त्र पोलिसांच्या दिशेने फेकून मारली. स्वतःच्या बचावासाठी या वेळी पोलीस उपनिरीक्षक युवराज शिंदे यांनी हवेत गोळीबार केला. ( thieves police face to face In Pune )

Thieves Police Face To Face
पुण्यात पोलीस चोरटे समोरासमोर
author img

By

Published : Feb 26, 2022, 5:39 PM IST

Updated : Feb 26, 2022, 5:49 PM IST

पुणे - पुण्यातील मार्केटयार्ड येथील एका हायक्लास सोसायटी असलेल्या चाफळकर नगरमध्ये बुधवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास एक थरार पाहायला मिळाला. या सोसायटीत तीन ते चार चोरटे घुसले. आणि याची माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी चोरांचा प्रतिकार करण्यास सुरुवात केली. यादरम्यान चोरट्यांनी कोयता आणि धारदार शस्त्र पोलिसांच्या दिशेने फेकून मारली. स्वतःच्या बचावासाठी या वेळी पोलीस उपनिरीक्षक युवराज शिंदे यांनी हवेत गोळीबार केला. त्यानंतर चोरटे अंधाराचा फायदा घेऊन शेजारच्या नाल्यामध्ये उडी मारून पळून गेले. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. ( thieves police face to face In Pune )

पोलिसांची प्रतिक्रिया

चोरटे झाले फरार -

पहाटे चाफळकरनगरमधील सोनिया अपार्टमेंटमध्ये 4 ते 5 चोरटे घुसले होते. सुरक्षा रक्षकाने चोरट्यांना पकडण्याचा प्रयत्न केला. परंतु चोरट्यांनी त्यांच्यावर दगडफेक केली. यासंदर्भात त्यांनी सोसायटीच्या चेअरमनला फोन करून माहिती दिली. सोसायटी चेअरमनने मार्केट यार्ड पोलीस ठाण्याच्या लँडलाईनवर फोन करून सोसायटीत चोरटे घुसल्याची माहिती दिली. ही माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक युवराज शिंदे हे त्यांच्या पथकासह सोसायटीमध्ये पोचले. यावेळी त्यांनी चोरट्यांना आम्ही पोलिस आहोत खाली या आणि सरेंडर करा असे आवाहन केले. मात्र, चोरट्यांनी त्यांच्या दिशेने पुन्हा दगडफेक सुरू केली. चोरटे खाली घेऊन पळून जात असताना पोलिसांनी त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी चोरट्यांनी त्यांच्या दिशेने धारदार कोयते आणि हत्यारे फेकून मारली.
पोलिसांनी स्वतःचा बचाव करताना शिंदे यांनी हवेमध्ये एक राऊंड फायर केला. घाबरलेले चोरटे सोसायटीच्या भिंतीवरुन सोडून शेजारच्या नाल्यात उडी मारून पळून गेले.

दोन स्वतंत्र गुन्हे दाखल -

मार्केट यार्ड पोलिसांनी या प्रकरणी घरफोडी आणि पोलिसांच्या खुनाचा प्रयत्न असे दोन स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत. घरफोडीची तक्रार सोसायटीचा सुरक्षारक्षक ताराप्रसाद अधिकारी (वय 36 रा. चाफळकर नगर, मूळ रा नागपूर) याने दिली आहे. तर पोलिसांच्या खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी उपनिरीक्षक युवराज शिंदे यांनी फिर्याद दिली आहे.

हेही वाचा - Snake Released in Offices Kolhapur : शेट्टींच्या 'त्या' आवाहनानंतर कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्यांच्या टेबलवर सोडला साप

Last Updated : Feb 26, 2022, 5:49 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.