ETV Bharat / city

पुणे : प्रसिद्ध शारदा गणेश मंदिरात चोरी, लाखोंच्या दागिन्यांसह रोख रक्कम लांबवली - पुणे शारदा गणेश मंदिरात चोरी न्यूज

पुणे शहराच्या मध्यवर्ती मध्यवस्तीत असणाऱ्या मंडई परिसरात शारदा गणेशाचे हे मंदिर आहे. मध्यरात्रीपर्यंत गजबजलेल्या असणाऱ्या या मंदीरात चोरी झाल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. शारदा गणपतीच्या मंदिरापासून काही अंतरावर पोलीस चौकी आहे. या परिसरात पोलिसांची गस्त ही सुरूच असते. तरीदेखील चोरट्यांनी दागिन्यांवर आणि रोख रकमेवर डल्ला मारल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. काही वर्षांपूर्वी याच मंदिरातील तब्बल 50 लाख रुपये किमतीचे दागिने चोरट्यांनी चोरून नेले होते.

पुणे शारदा गणेश मंदिरात चोरी न्यूज
पुणे शारदा गणेश मंदिरात चोरी न्यूज
author img

By

Published : Jan 8, 2021, 12:34 PM IST

Updated : Jan 8, 2021, 2:07 PM IST

पुणे - मंडई परिसरातील प्रसिद्ध शारदा गणेश मंदिरात चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मध्यरात्रीच्या सुमारास मंदिरात घुसलेल्या चोरट्यांनी 20 ते 25 तोळे सोन्याचे दागिने अन् रोख रक्कम चोरून गेल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. शारदा गणेश मंडळ हे पुणे शहरातील प्रमुख मंडळापैकी एक गणेश मंडळ आहे. अनेक पुणेकरांचे श्रद्धास्थान असणाऱ्या या मंदिरात चोरी झाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. विश्रामबाग पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुणे : प्रसिद्ध शारदा गणेश मंदिरात चोरी, लाखोंच्या दागिन्यांसह रोख रक्कम लांबवली

हेही वाचा - जामखेड ठाण्याचा पोलीस उपनिरीक्षक लाचलुचपतच्या जाळ्यात, गुन्हा दाखल

घटना सीसीटीव्हीमध्ये कैद

शुक्रवारी पहाटेच्या सुमारास मंदिरात शिरलेल्या अज्ञात चोरट्यांनी दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली. आज पहाटे जेव्हा काही नागरिक मंदिरात गेले तेव्हा हा सर्व प्रकार उघडकीस आला. त्यानंतर त्यांनी तातडीने पोलिसांना याची माहिती. विश्रामबाग पोलिसांनी हे तातडीने घटनास्थळी धाव घेत संपूर्ण परिसराची पाहणी केली आणि अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून आरोपींचा शोध घेतला जात आहे.

मध्यरात्रीपर्यंत गजबजलेल्या असणाऱ्या मंदिरात चोरी

पुणे शहराच्या मध्यवर्ती मध्यवस्तीत असणाऱ्या मंडई परिसरात शारदा गणेशाचे हे मंदिर आहे. मध्यरात्रीपर्यंत गजबजलेल्या असणाऱ्या या मंदिरात चोरी झाल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. शारदा गणपतीच्या मंदिरापासून काही अंतरावर पोलीस चौकी आहे. या परिसरात पोलिसांची गस्त ही सुरूच असते. तरीदेखील चोरट्यांनी दागिन्यांवर आणि रोख रकमेवर डल्ला मारल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

याआधीही चोरी

काही वर्षांपूर्वी याच मंदिरातील तब्बल 50 लाख रुपये किमतीचे दागिने चोरट्यांनी चोरून नेले होते. सोबतच एक नेकलेसही चोरट्यांनी चोरून नेला होता. या सर्व घटनेमुळे तेव्हा एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर आज पहाटे सुद्धा असाच प्रकार घडला. विश्रामबाग पोलीस घटनेचा अधिक तपास करीत आहेत.

हेही वाचा - नंदुरबारमध्ये नायलॉन मांजा विक्री करणाऱ्यांवर पोलिसांची धडक कारवाई

Last Updated : Jan 8, 2021, 2:07 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.