ETV Bharat / city

प्रवाशांनी खचाखच भरलेल्या धावत्या स्टार बसने घेतला पेट, सुदैवाने जीवितहानी टळली - स्टार बस पेटली नागपूर

प्रवाशांनी खचाखच भरलेल्या धावत्या स्टार बसने भर रस्त्यात अचानक पेट घेतला, त्यामुळे गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. घटनेचे गांभीर्य ओळखून चालकाने बस थांबवून प्रवाशांना खाली उतरण्यास सांगितले. त्यामुळे, मोठा अनर्थ टळला आहे.

star bus nagpur caught fire
स्टार बस पेटली नागपूर
author img

By

Published : Mar 8, 2022, 8:42 PM IST

नागपूर - प्रवाशांनी खचाखच भरलेल्या धावत्या स्टार बसने भर रस्त्यात अचानक पेट घेतला, त्यामुळे गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. घटनेचे गांभीर्य ओळखून चालकाने बस थांबवून प्रवाशांना खाली उतरण्यास सांगितले. त्यामुळे, मोठा अनर्थ टळला आहे. ही घटना नागपूर शहरातील गड्डीगोदाम परिसरात घडली.

पेटत्या बसचे दृश्य

हेही वाचा - VIDEO : सावित्रीच्या लेकींच्या हाती सावित्री पथकाची जवाबदारी

महानगरपालिकेची शहर बस सेवा म्हणून स्टार बस ओळखली जाते. आज दुपारच्या वेळेस एक स्टार बस प्रवाशांना घेऊन कामठी मार्गाने जात असताना बसच्या टॅंकमधून अचानक डिझेलची गळती सुरू झाली. ही बाब चालक आणि वाहकाच्या लक्षात येण्यापूर्वीच बसने पेट घेतला, मात्र त्यानंतर बस चालकाने प्रसंगावधान राखत बस थांबवून प्रवाशांना बस बाहेर पडण्याची सूचना केली.

थोडक्यात अनर्थ टळला

ज्यावेळी बसने पेट घेतला तेव्हा बसमध्ये अनेक प्रवासी होते. चालकाने घटनेचे गांभीर्य ओळखून प्रवाशांना बस बाहेर काढले, त्यामुळे मोठा अनर्थ टळला. घटनेची माहिती समजताच अग्निशमन विभागाच्या पथकाने घटनास्थळ गाठले व आग विझवली.

हेही वाचा - Nagpur Red Light Area : 'नराधमांनो, बलात्कार करायचा असेल तर वारांगणांच्या वस्तीत या'; ज्वाला धोटेंचं वक्तव्य

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.