पुणे - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरत्या वर्षाला निरोप देताना नव्या वर्षात नो कोरोना, आणि दारु नको दूध प्या, असा संदेश तरुणाईने दिला. नववर्षाचे स्वागत करताना चांगले विचार आणि संकल्प मनात ठेवून प्रत्येकाने व्यसनमुक्त भारताचे स्वप्न रंगवावे. याकरीता नववर्षाच्या पूर्वसंध्येला विविध सामाजिक संस्था आणि महाविद्यालयांतील तरुणाईने युथ अगेन्स्ट अॅडिक्शनचा संदेश दिला. कोरोना विषाणूच्या वेशातील कलाकारांनी नो कोरोना, आणि दारु नको, दूध प्या, असे म्हणत प्रबोधन केले आणि रस्त्यावर उतरुन लक्षणीय सहभाग घेत फलकांद्वारे जनजागृती करीत सरत्या वर्षाला निरोप दिला.
आनंदवन व्यसनमुक्ती केंद्र, मराठवाडा मित्र मंडळ कॉलेज ऑफ कॉमर्स, कात्रज डेअरी आणि पुणे शहर पोलीस वाहतूक विभागातर्फे डेक्कन जवळील गुडकल चौकात नो कोरोना आणि दारु नको, दूध प्या या कार्यक्रमांतर्गत जनजागृतीचे आयोजन करण्यात आले. यावेळी खासदार गिरीष बापट, आमदार सिद्धार्थ शिरोळे, नगरसेविका निलीमा खाडे, संतोष राजगुरु, केंद्राचे अध्यक्ष डॉ.अजय दुधाणे, अनिरुद्ध हळंदे, दत्तात्रय सोनार, राजन चांदेकर, महेश वाडेकर, विवेक राजगुरु, हर्षल पंडित, राहुल बोंबे, प्रकाश पवार, अमित शिंदे, प्रा. सुशील गंगणे यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. गेल्या ९ वर्षांपासून राबविण्यात येत आहे उपक्रम-डॉ. अजय दुधाणे म्हणाले, बाटली फोडा आरोग्य जोडा, स्वच्छता पाळू कोरोना टाळू, मास्क वापरा कोरोना टाळा, दारु नको दूध प्या मानवतेचा बोध घ्या, यासारखे सामाजिक संदेश देणारे फलक हातात घेऊन जनजागृती तरुणाई करीत होती. व्यसनाधिनतेच्या विळख्यात अडकत चाललेल्या तरुणाईला योग्य दिशा दाखविण्याकरीता मराठवाडा मित्र मंडळ कॉलेज ऑफ कॉमर्समधील एनएसएसच्या विद्यार्थ्यांनी देखील सहभाग घेतला. तर दारु नको दूध प्या, हा संदेश देत दूध वाटप करण्यात आले. गेल्या ९ वर्षपासून आनंदवन व्यसनमुक्ती आणि पुनर्वसन केंद्रातर्फे गुडलक चौकात दारु नको दूध प्या, हे उपक्रम राबविण्यात येतात.हेही वाचा- निरोप 2020: मंबईने देशातील सर्वाधिक कोरोना रुग्ण असतांना दिला लढा