ETV Bharat / city

Dedication ceremony Shila temple : पंतप्रधानांच्या हस्ते होणार शिळा मंदिराचा लोकार्पण सोहळा

देहूतील शिळा मंदिराचा लोकार्पण सोहळा ( Dedication ceremony Shila temple ) पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Prime Minister Narendra Modi ) यांच्या हस्ते होणार आहे. हे शिळा मंदिर नेमके कसे आहे? अशी उत्सुकता अनेकांना लागली आहे. तर चला जाणुन घेऊया शिळा मंदिराबद्दल. या मंदिराची उंची 42 फूट आहे. तसेच मंदिरातील जगतगुरु संत तुकाराम महाराज ( Sant Tukaram Maharaj ) यांच्या मूर्तीची उंची 42 इंच आहे. 14 जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देहूत ( Prime Minister coming Dehu) येणार असून त्यांच्या उपस्थितीत लोकार्पण सोहळा पार पडणार आहे.

Dedication ceremony of Shila temple
शिळा मंदिराचा लोकार्पण सोहळा
author img

By

Published : Jun 12, 2022, 1:18 PM IST

Updated : Jun 12, 2022, 2:03 PM IST

पिंपरी-चिंचवड - देहूतील शिळा मंदिराचा लोकार्पण ( Dedication ceremony Shila temple ) सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Prime Minister ) यांच्या हस्ते होणार आहे. हे शिळा मंदिर नेमके कसे आहे? अशी उत्सुकता अनेकांना लागली आहे. तर चला जाणुन घेऊया शिळा मंदिराबद्दल. या मंदिराची उंची 42 फूट आहे. तसेच मंदिरातील जगतगुरु संत तुकाराम महाराज ( Sant Tukaram Maharaj ) यांच्या मूर्तीची उंची 42 इंच आहे. विशेष म्हणजे तुकोबांची मूर्ती देखील अवघ्या 42 दिवसात घडवली आहे. अशी माहिती शाहीर, शिल्पकार चेतन रवींद्र हिंगे यांनी दिली आहे. 14 जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी देहूत ( Prime Minister coming Dehu) येणार असून त्यांच्या उपस्थितीत लोकार्पण सोहळा पार पडणार आहे.

शिळा मंदिर, देहू

शिळेवर तुकोबारायांचे चरण स्पर्श - देहू संस्थानचे नितीन महाराज मोरे म्हणाले की, जगतगुरु संत तुकाराम महाराज यांच्या अभंगगाथा तरल्या गेल्या. त्या कालावधीत तुकाराम महाराजांनी 13 दिवस अन्न, पाणी सोडून अनुष्ठानसाठी बसले होते. भगवंतांच्या कृपेने अभंगगाथा दगडासह वर आल्या आणि तुकोबारायांनी अनुष्ठान सोडले. ज्या शिळेवर तुकोबारायांचे चरण स्पर्श झाले ( Tukobara shoes rock ) होते, ती शिळा भाविकांच्या दर्शनासाठी तपोवन महाराजांनी देहू मंदिरात आणून ठेवली होती. ते तुकोबांचे चिरंजीव होते. त्या शिळेवर भव्यदिव्य मंदिर असावं असा वारकरी संप्रदायाचा ( Warkari sect ) आग्रह होता. वारकऱ्यांची ही मागणी देहू संस्थान पूर्ण करत आहे याचा आनंद आहे असे ते म्हणाले.

प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन - दरम्यान, 2008 साली तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील ( former President Pratibhatai Patil) यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले होते. प्रत्येक्षात 2015 -16 साली शिळा मंदिराच काम सुरू झालं. मंदिराची रचना हेमाडपंथी असून मूळ गर्भगृह 14 × 14., अंतर गर्भगृह 9×9, उंची 17 × 12, तर, मंदिराची उंची 42 फूट आहे. मंदिरातील तुकोबांच्या मूर्तीची उंची 42 इंच आहे. राजस्थान येथील एका खाणीतील दडगापासून तुकोबारायांची मूर्ती घडवण्यात आली आहे. तुकोबांचे वय 42 सांगण्यात आलं होतं. त्यामुळं त्याच वयातील तुकोबा साकारण्याचे मोठं आव्हान होतं. मात्र, अवघ्या 42 दिवसात मूर्ती घडवण्यात आली. मूर्तीमध्ये विना, चिपळे, पगडी असा देखावा दाखवण्यात आला आहे. तुकोबांची मूर्ती घडवण्याची मला संधी मिळाली ही मागच्या जन्माची पुण्याई आहे असे शिल्पकार चेतन रवींद्र हिंगे ( Sculptor Chetan Ravindra ) यांनी सांगितले.

हेही वाचा - Granade Recovered : एनएसजीची मोठी कारवाई.. दिल्लीत ग्रेनेड जप्त.. कारवाईसाठी गेल्यावर गोळीबार २ जखमी, १ अटकेत

हेही वाचा - राष्ट्रपतीपद निवडणूक : सोनिया गांधींनी साधला शरद पवार, ममता बॅनर्जींशी संपर्क

हेही वाचा - ED Chargesheet Against Satish Uke : नाना पटोले यांचे वकील सतीश उके यांच्याविरोधात ईडीकडून आरोपपत्र दाखल

Last Updated : Jun 12, 2022, 2:03 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.