पुणे - मोठ्या प्रमाणात डब्ल्यू-डब्ल्यूई (wwe) हा आंतरराष्ट्रीय शो पाहणारे लोक आहेत. आता या मनोरंजन करणाऱ्या व्यवसायिक कुस्ती लीगमध्ये पुण्यातील शिवा आनवेकर या तरुणाचा व्यावसायिक कुस्तीगीर म्हणून समावेश झाला आहे. राज्यातील पहिला व्यावसायिक रेसलर म्हणून त्याची ओळख निर्माण होऊ लागली आहे. (the great Khali) सोशल मीडियावर त्याचे रेसीलिंगचे व्हिडीओ चांगलेच व्हायरल होऊ लागले आहेत. सामान्य कुटुंबातील व्यक्तीने हे यश संपादन केल्याने त्याचे मोठ्या प्रमाणात सर्वत्र कौतुक होत आहे.
अखेर पाहिलेलं स्वप्न पूर्ण झालं
सर्व सामान्य कुटुंबातील असणारा मूळचा पुण्याच्या पेठेत राहणारा शिवा आनवेकर हा तरुण. त्याच्या रेसिंगला साजेल अशी त्याची उंची आहे. त्याची उंची 6.5 इतकी आहे. रेसीलिंगची त्याला लहानपणापासून आवड. (The Great Khali Academy) पुण्याच्या सरहद शाळेतून त्याने आपले शिक्षण पूर्ण केले आहे. पण आवड असतानाही घरच्या परिस्थितीमुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर रेसीलिंगला शिवा जाऊ शकला नाही. सुरुवातीला शिवा याने सेल्समन म्हणून एका कंपनीत काम करायला सुरुवात केली. सेल्समनची नोकरी करत असताना त्याला त्याचे टार्गेट खुणावत होते. नोकरीत त्याचे मन रमत नव्हते. त्याची उंची असताना आपल्याला रेसीलिंगसाठी संधी मिळेल का? असे अनेक प्रश्न त्याला नेहेमी खुणावत होते. त्याच्या या प्रयत्नांना आता येश आले आहे.
![पुण्याचा शिवा आवणेकर आणि खली](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-pun-05-shiva-aavnekar-reslar-avb-7210735_20022022185324_2002f_1645363404_239.jpg)
राज्यातील पहिला प्रोफेशनल रेसलर म्हणून त्याची ओळख
'द ग्रेट खली'सोबत त्याचा संपर्क झाला आणि पुढे पंजाब जालंदरला खलीच्या अकॅडमीमध्ये शिवाने प्रशिक्षण घेतले. आणि आज तो एक प्रोफेशनल रेसलर म्हणून नाव कमावतो आहे. रेसीलिंगमध्ये रिस्क असल्याने कुणीही यात करियर करायला मागत नाही. मात्र, या तरुणाने प्रोफेशनल रेसलर म्हणून त्याने नाव मिळवण्यास सुरुवात केली आहे. तो आता मोठा सेलिब्रिटी झाला आहे. राज्यातील पहिला प्रोफेशनल रेसलर म्हणून त्याची ओळख निर्माण झाली आहे.
व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्याप्रमाणात व्हायरल
सध्या शिवा खलीच्या ऍकॅडमीमध्ये प्रशिक्षक म्हणून काम तर करत आहे. पण त्या व्यतिरिक्त खलीच्या इंस्टावरच्या स्टोरीज आणि रिल्समध्येही त्याला खास महत्व प्राप्त झाले आहे. खली आणि शिवाच्या अनेक व्हिडिओला लोकांची चांगलीच पसंती मिळत आहे.
हेही वाचा - रणवीर सिंगला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा तर कृती सेननला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा दादासाहेब फाळके पुरस्कार 2022