ETV Bharat / city

Pune will be Corona Free : पुणे शहराची वाटचाल कोरोनामुक्तीकडे, शहरात केवळ 112 सक्रिय रुग्ण

author img

By

Published : Mar 21, 2022, 9:21 PM IST

कोरोनाच्या दोन वर्षाच्या काळात शहर म्हणजे पुणे शहर देशभरात सर्वाधिक चर्चेत होते. पुणे शहरात आजपर्यंत 6 लाखांहून अधिक कोरोनाचे रुग्ण या 2 वर्षात आढळून आले आहेत. यातील शहरात आजमितीला फक्त 112 हे सक्रिय रुग्ण असून दररोजची कोरोना रुग्णांची संख्या पाहता पुणे शहराची वाटचाल कोरोनामुक्तीकडे होत आहे.

पुणे
पुणे

पुणे - कोरोनाच्या दोन वर्षाच्या काळात शहर म्हणजे पुणे शहर देशभरात सर्वाधिक चर्चेत होते. पुणे शहरात आजपर्यंत 6 लाखांहून अधिक कोरोनाचे रुग्ण या 2 वर्षात आढळून आले आहेत. यातील शहरात आजमितीला फक्त 112 हे सक्रिय रुग्ण असून दररोजची कोरोना रुग्णांची संख्या पाहता लवकरच पुणे शहर कोरोनामुक्त होणार आहे.

माहिती सहायक आरोग्य अधिकारी

शहरात दुसऱ्या लाटेत सर्वाधिक रुग्णसंख्या - शहरात कोरोनाचा पहिला रुग्ण 9 मार्च, 2020 ला आढळून आल्यानंतर पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या लाटेत मोठ्या प्रमाणात शहरात कोरोनाचे रुग्ण हे आढळून आले. शहरात पहिल्या लाटेत 19 हजार सक्रिय रुग्ण होते. तर दुसऱ्या लाटेत सर्वाधिक 56 हजार 600 इतकी रुग्णसंख्या होती. आत्ता तिसऱ्या लाटेत शहरात 54 हजार एवढी सक्रिय रुग्णसंख्या होती. या तिन्ही लाटेत शहरात सर्वाधिक दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या होती.

दोन वर्षांच्या काळात 6 लाख 61 हजार 737 एवढे रुग्णसंख्या - पुणे शहरात कोरोनाच्या या दोन वर्षांच्या काळात 6 लाख 61 हजार 737 एवढे रुग्णसंख्या आढळून आले आहे तर आत्तापर्यंत 6 लाख 5 हजार 2277 एवढ्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आले आहे. तर शहरात आत्ता पर्यंत 9 हजार 348 रुग्णांच मृत्यू झाले आहे. शहरात आज 12 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. तर एकही रुग्णचा मृत्यू झालेले नाही. शहरात आजच्या दिवशी फक्त 112 पॉझिटिव्ह रुग्ण असून शहर लवकरच कोरोनामुक्त होणार आहे.

चौथी लाट आली तरी सौम्य असेल - एकीकडे देशभरात कोरोनाच्या रुग्णसंख्या कमी होताना दिसत आहे. दुसरीकडे जगभरातील काही देशांमध्ये पुन्हा कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होताना दिसत आहे. काही शहरांमध्ये तर पुन्हा टाळेबंदी लावण्यात आले आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून मार्गदर्शन सूचना आले आहे. त्याचे पालनही महापालिकेच्यामाध्यमातून करण्यात येत आहे. शहरातील साध्याची परिस्थिती पाहता जर चौथी लाट आली तरी ती सौम्य स्वरूपाची असेल, असेही यावेळी महापालिकेचे सहायक आरोग्य अधिकारी डॉ. संजीव वावरे यांनी सांगितले आहे.

पुणे शहर जरी आजमितीला जरी कोरोनामुक्तीकडे वाटचाल करत असेल तरी कोरोना अजूनही संपलेले नाही. त्यामुळे नागरिकांनी त्रिसूत्रीच पालन करावे, असे आवाहनही यावेळी वावरे यांनी केले.

हेही वाचा - राज्य सरकारच्या कुटुंब नियोजनाच्या 'त्या' निर्णयाने आशा सेविका नाराज, काय आहे नेमक कारण?

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.