ETV Bharat / city

पुण्यात मृतदेह रस्त्यावर आणून टाकल्याने खळबळ

हडपसर पोलीस ठाण्यात याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी याप्रकरणी दोघांना ताब्यात घेतले आहे.

हडपसर पोलीस
हडपसर पोलीस
author img

By

Published : Jan 1, 2021, 5:58 PM IST

पुणे - केटरिंगच्या कामासाठी सोबत नेलेल्या कामगाराचा रात्री झोपेतच मृत्यू झाला. पोलीस चौकशीचे कटकट आपल्या मागे लागू नये, यासाठी मालकाने मित्रांच्या मदतीने त्याचा मृतदेह पुण्यातील मगरपट्टा परिसरात टाकून दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. चादरित गुंडाळून मृतदेह रस्त्यावरच टाकून दिल्याने संपूर्ण पुणे शहरात खळबळ उडाली होती. हडपसर पोलीस ठाण्यात याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी याप्रकरणी दोघांना ताब्यात घेतले आहे.

याप्रकरणी मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, ताब्यात घेतलेल्या व्यास यांचा केटरिंगचा व्यवसाय आहे. हडपसर परिसरात पुलाजवळ अनेक बिगारी कामगार उभे असतात. यातील काहीजण येथून कामगार नेतात. त्याच प्रमाणे व्यास यांनी देखील संतोष याला कामासाठी लोणीकाळभोर येथे नेले होते. त्याने दिवसभर काम केले आणि रात्री कामगारांच्या खोलीत झोपला. सकाळी व्यास त्याला उठवण्यास गेल्यानंतर मात्र तो मयत झाला होता.

पुटपाथवर मृतदेह ठेवून पसार-

हा प्रकार लक्षात आल्यानंतर भितीने व्यास याने त्याच्या दोन मित्रांना बोलावले. हा प्रकार सांगितला. त्यानंतर त्यांनी चादरीत मृतदेह गुंडाळला आणि सकाळी सकाळी छोटा हत्तीमधून मगरपट्टा सिटी येथील लोहिया गार्डनजवळ पुटपाथवर मृतदेह ठेवून पसार झाले. नागरिकांच्या हा प्रकार निदर्शनास आल्याने त्यांनी हडपसर पोलिसांना या घटनेची माहिती दिली. त्यानंतर हडपसर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच मृतदेह ससून रुग्णालयात पाठवला आहे. शोध घेतल्यानंतर हा सर्व प्रकार समोर आला.

आकस्मिक मृत्यूची नोंद

दरम्यान हा सर्व प्रकार लोणी काळभोर परिसरात घडला असून, आकस्मिक मृत्यूची नोंद केल्यानंतर तो लोणीकाळ भोर पोलिसांकडे वर्ग करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

हेही वाचा- 'बिनविरोध' ग्रामपंचायत : अनेक वर्षांचा संघर्ष बाजूला ठेऊन भाऊ आले एकत्र

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.