ETV Bharat / city

TET Exam Scam : दुसऱ्या धाडीतही तुकाराम सुपेंच्या घरी मिळाले घबाड.. 2 कोटीहून अधिक रोखड व सोने जप्त

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष तुकाराम सुपे यांच्या घरात आज पुणे पोलिसांनी छापा (Raid on Tukaram Supe House) टाकला असता 2 कोटी रुपयांची कॅश आणि काही सोने मिळाले आहे. सुपे यांच्या घरातून पहिल्या धाडीत 88 लाख रुपयांची रोख रक्कम जप्त केल्यानंतर आता दुसऱ्या धाडीत दोन कोटींहून अधिक रक्कम पोलिसांनी जप्त केली आहे.

tet exam scam
tet exam scam
author img

By

Published : Dec 20, 2021, 3:12 PM IST

Updated : Dec 20, 2021, 5:31 PM IST

पुणे - टीईटी परीक्षा घोटाळ्याप्रकरणी (TET Exam Scam) अटक करण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष तुकाराम सुपे यांच्या घरात आज पुणे पोलिसांनी छापा (Raid on Tukaram Supe House) टाकला असता 2 कोटी रुपयांची कॅश आणि काही सोने मिळाले आहे. याआधी तुकाराम सुपे यांच्याकडून पुणे पोलिसांनी 88 लाख रूपये आणि सोन्याचे दागिने हस्तगत केले होते.

पोलीस कारवाईविषयी माहिती देताना पोलीस आयुक्त
तपासात दोन कोटीहून अधिक रक्कम आणि सोने मिळाले -
टीईटी TET परीक्षा घोटाळा (TET Exam Scam ) प्रकरणातील दुसऱ्या धाडीत तुकाराम सुपे यांच्या घरी आणखीन पैशाचे घबाड पोलिसांच्या हाती (Raid on Tukaram Supe House ) लागली आहे. तपासात घरातून दोन कोटीहून अधिक रक्कम आणि सोने हस्तगत करण्यात आले आहे. सुपे यांच्या घरी पोलीस धाड टाकायच्या आधीच पत्नी आणि मेहुण्याने रक्कम दुसरीकडे ठेवली होती. मात्र पोलिसांनी कसून तपास केल्यानंतर दोन कोटीहून अधिक रक्कम आणि सोने तपासात मिळाले आहे.
सुपे यांना 17 डिसेंबरला करण्यात आली अटक -
शिक्षक पात्रता परीक्षेत पैसे घेऊन उत्तीर्ण केल्याचा ठपका असलेले राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांना पोलिसांनी अटक केली आहे. टीईटी परीक्षेचा पेपर फुटल्यानंतर सायबर पोलिसांनी केलेल्या तपासात सुपे यानी पेपर फुटीला मदत केल्याचे समोर आले होते. त्यांचा सल्लागार अभिषेक सावरीकर यालाही अटक करण्यात आली आहे.

Last Updated : Dec 20, 2021, 5:31 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.