पुणे : पुण्यातील जलतरणपटू सागर कांबळे ( Swimmer Sagar Kambale ) याने भारतीयांची मान उंचावण्याची कामगिरी करीत अवघ्या 14 तास 48 मिनिटांत जगप्रसिद्ध इंग्लिश खाडी (34 किलोमीटर अंतर) चौदा अंश सेल्सिअस तापमानात पार ( Temperature of 14 Degrees Crossed English Firth ) केली. या माध्यमातून या युवा जलतरणपटूने आतापर्यंत अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत.
खडतर इंग्लिश खाडी पार : शालेय जीवनापासूनच पोहण्याची आवड निर्माण झाली होती. यातूनच अनेक शाळा, महाविद्यालयांच्या स्वीमिंग कॉम्पिटीशनमध्ये सहभाग घेतला. मात्र, इंग्लिश खाडी सतत खुणावत होती. याबद्दल अनेकांकडून ऐकले होते. इंग्लंडचा दक्षिण किनारा व फ्रान्सचा उत्तर किनारा यामधील अटलांटिकचा भाग इंग्लिश खाडी म्हणून ओळखला जातो. ही खाडी अत्यंत कमी तापमानात सर करणे मोठे आव्हानात्मक होते. अखेर अवघ्या 14 तास 48 मिनिटांत ही खाडी सर करण्यात यश मिळाले. इंग्लिश खाडी सर करण्याचे स्वप्न गेल्या काही वर्षांपासून पाहत होतो. लाटांचा चढ-उतार, वारे, थंडी असे अडथळे येत असतानाही 34 किलोमीटरचे अंतर पार करण्यात यशस्वी झालो. आपण हे अंतर यशस्वी पार करू, असा आत्मविश्वास सुरुवातीपासून होते. हा खडतर जलप्रवास होता. असे यावेळी जलतरणपटू सागर कांबळे यांनी सांगितले.
सागरची कामगिरी : सागर हा पुण्यातील काळेवाडी येथे वास्तव्यास आहे. वयाच्या आठव्या वर्षापासून त्याला जलतरणाचे वेड लागले. तेव्हापासून अनेक शालेय, जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय तसेच राष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागी होत त्याने चमकदार कामगिरी केली. २०१५ मध्ये चंदीगड येथे झालेल्या अखिल भारतीस आंतरविद्यापीठ स्पर्धेत त्याने ४ बाय २०० मीटर रिले प्रकारात रौप्यपदक जिंकले होते. त्याच वर्षी झालेल्या वरिष्ठ राज्यस्तरीय स्पर्धेत सागरने ४ बाय १०० मीटर रिले स्पर्धेत आपल्या संघाला सुवर्णपदक जिंकून दिले होते. २०१४ मध्ये झालेल्या वरिष्ठ राज्यस्तरीय स्पर्धेत २०० मीटर बटरफ्लाय स्पर्धेत तो रौप्यपदकाचा मानकरी ठरला होता.
सागरची राज्यस्तरीय कामगिरी : 74 व्या ओपन वॉटर लॉंग डिस्टन्स स्वीमिंग कॉम्पिटीशन कोलकातामध्ये 81 किमी अंतर 11 तास 36 मिनिटात, कॅटलीना चॅनल स्वीमिंग फेडरेशन (USA) 2018 स्पर्धेत 36 किमी अंतर 10 तास 28 मिनिटात, 76 ओपन वॉटर लॉंग डिस्टन्स स्वीमिंग कॉम्पिटीशन कोलकाता 2019 मध्ये 19 किमी अंतर 2 तास 20 मिनिटात, नॅशनल ओपन वॉटर स्वीमिंग कॉम्पिटीशन गोवा 2019 मध्ये 10 किमी अंतर पार करीत सुवर्णपदक, गेट वे ऑफ इंडिया ते वाशी ब्रिज 2022 मध्ये 25 किमी अंतर 4 तास 42 मिनिटात, तर 32 वीर सावरकर ऑल इंडिया सी स्वीमिंग कॉम्पिटीशन गुजरात 2022 मध्ये 21 नोटिकल मैल अंतर 5 तास 18 मिनिटात सर करीत ब्राँझ मेडल पटकावले आहे. आणि आता इंग्लिश खाडी ३४ कि.मी. ची लांबी असणारी १४ तास 48 मिनिटात पूर्ण केली आणि एक वेगळा विक्रम प्रस्थापित केला.
जलतरणमधील कामगिरी
१) दक्षिण अफ्रिकेतील शेबन आयलँड ९ कि.मी. अंतर त्याने २ तास १२ मिनीटात सर केले (सन २०१७)
२) अमेरिकेतील कॅटलिना चॅनल ३२ कि.मी. अंतर १० तास ५८ मिनिटात सर केले (सन २०१८)
३) डॉगलेग स्मीम दक्षिण अफ्रिकेत १८ कि.मी. चे अंतर ६ तास ३८ मिनिटांत पार केले.
४) धर्मतर ते गेटवे ऑफ इंडिया हे ३५ कि.मी. चे अंतर ७ तास ४५ मिनिटांत पार केले (सन २०१७)
५) सन २०१४ मध्ये सिनीअर स्टेट रेकॉर्ड महाराष्ट्रमध्ये रौप्य पदक पटकावले
६) ८१ कि.मी. ची जगातील सर्वात लांबची स्पर्धा पश्चिम बंगाल ११ तास ३२ मिनिटांत पार केले (सन २०१९)
७) पश्चिम बंगालमधील १९ कि.मी. ची लांब पल्ल्याची स्पर्धा २ तास १८ मिनिटांत पार केले (सन २०१९ )
८) ज्येष्ठांच्या राष्ट्रीय स्पर्धेतील सहभाग
९) ऑल इंडिया युनिवर्सिटीमध्ये रौप्य पदक (२०१५)
१०) सन क्रॉक लाईट हाऊस ते गेटवे ऑफ इंडिया हे ५ कि.मी. चे अंतर ५४ मिनिटात पार करून रौप्यपदक पटकावले (सन २०१३)
११) सन क्रॉक लाईट हाऊस ते गेट वे ऑफ इंडिया हे ५ कि.मी. चे अंतर ४३ मिनीट १० सेकंदात पार करून गोल्ड मेडल पटकावले.
१२) गोल्डन जुनेली पोहण्याची स्पर्धा (रत्नागिरी येथे ३ कि.मी. १६ मिली. ३० सेकंदात पार करून गोल्ड मेडल मिळविले.
१३) अॅक्वामॅन सन २०१९ मध्ये झालेली स्पर्धा १० कि.मी. ची पार करून गोल्ड मेडल.
१४) शालेय राष्ट्रीय स्तरावर जलतरण स्पर्धात सहभाग (सन २०१२-१४)
१५) सन २०१३ सालची अॅथलॉन स्टेट कॉम्पिटीशन स्पर्धा कांस्यपदक विजेता (सन २०१३)
१६) सिनिअर स्टेट मेडल सन २०१३ मध्ये कांस्य विजेता.
हेही वाचा : World Environment Day : जागतिक पर्यावरण दिना निमित्त केला सलग चोवीस तास पोहण्याचा विक्रम