ETV Bharat / city

Bicycle thieves arrested in Pune : सायकली चौरायचे अन् त्या पैशातून गावाला विमानाने जायचे; स्वारगेट पोलिसांकडून दोघांना अटक - पुण्यात महागड्या सायकल चोरांना अटक

पुण्यात दोन सुशिक्षित तरुण शहरातील विविध भागातून महागड्या सायकली चोरायचे (Bicycle Robbery in Pune) आणि मौजमजा करायचे. ते पैसे संपले की परत चोऱ्या करायचे आणि त्यातून मिळलेल्या पैशातून तो तरुण विमानाने गावाला (Swargate police arrested two bicycle thieves) जायचे. अशा या दोन चोरांना स्वारगेट पोलिसांनी (Swargate Police Robbery News) अटक केली आहे. हे आरोपी मूळचे पश्चिम बंगालचे रहिवासी आहेत.

bicycle robbery
स्वारगेट पोलिसांकडून दोघांना अटक
author img

By

Published : Apr 20, 2022, 5:35 PM IST

Updated : Apr 20, 2022, 8:26 PM IST

पुणे - मौजमजा करण्यासाठी कोण काय करेल याची आजच्या जगात काहीच नेम नाही.अन् कोणी कल्पना देखील करू शकत नाही. पुण्यात दोन सुशिक्षित तरुण शहरातील विविध भागातून महागड्या सायकली चोरायचे (Bicycle Robbery in Pune) आणि मौजमजा करायचे. ते पैसे संपले की परत चोऱ्या करायचे आणि त्यातून मिळलेल्या पैशातून ते आरोपी विमानाने गावाला (Swargate police arrested two bicycle thieves) जायचे. अशा या दोन चोरांना स्वारगेट पोलिसांनी (Swargate Police Robbery News) अटक केली आहे.

प्रतिनिधींनी घेतलेला आढावा

बुद्धदेव विष्णु बीश्वास (वय 22 वर्षे. रा. दुर्गापूर, जि. बरद्यान, पश्चिम बंगाल) आणि त्याचा साथीदार जयंता हेमंत कुमार बीश्वास (वय 22 वर्ष रा. बरद्वान दुर्गापुर पश्चिम बंगाल) या दोघांना स्वारगेट पोलिसांनी सापळा रचून पकडले आहे.

35 च्या वर सायकली चोरल्या - पुण्यात चोरीच्या घटना या नेहमीच घडत असतात. मात्र, स्वारगेट पोलिसांनी महागड्या सायकल चोरी करणाऱ्या चोरांना पकडण्यात यश मिळवले आहे. इतकेच नाही तर ते चोर सायकली विकून पैसे मिळवायचे अन् त्यातून मिळणाऱ्या पैशातून मौज करत होते. तसेत ते दोन चोर गावाला देखील थेट विमानाने जायचे. आरोपी हे रात्रीच्या वेळी पुण्यातील उच्चभ्रू सोसायटीत आधुनिक व महागड्या सायकली चोरून त्याची विक्री करायचे. अशा या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. या दोघांनी स्वारगेट, भारती विद्यापीठ, सहकार नगर, डेक्कन व खडक पोलीस स्टेशनच्या हद्दीतून सुमारे 35 च्या वर सायकली व एक बुलेट मोटरसायकल चोरली होती. या सर्व सायकली पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत.

पद्धतशीरपणे करत होते चोरी - गेल्या तीन ते चार महिन्यांपासून स्वारगेट व आजूबाजूच्या पोलीस स्थानकाच्या हद्दीत उच्चभ्रू वस्त्यांमधून आधुनिक व महागड्या सायकली चोरीस जात असल्याबाबत तक्रारी सुरू झाल्या होत्या. परंतु चोर हे अतिशय हुशार असल्याने ते सापडत नव्हते, ते सतत गुंगारा देत होते. रस्त्यावरील सीसीटीव्ही फुटेज व मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण केले. तेव्हा कुठे त्यांना दोन तरुण बुलेट मोटरसायकलचा वापर करून पद्धतशीरपणे सायकल चोरी करत असल्याचे दिसून आले. त्यानंतर ते विमानाने ज्या दिवशी कोलकाता येथे जाणार होते, त्याच्या एक दिवशी आधीच पोलिसांनी त्यांना अटक केली आहे, अशी माहिती स्वारगेट पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक इंदलकर यांनी दिली.

दहा दिवसांपासून होते मागावर - गेले 10 दिवसांपासून पोलीस पथक त्यांच्या मागावर होते. परंतु; चोरटे अतिशय चालाख होते. या चोरांनी सायकल चोरीचा सपाटा लावला होता. सायकली चोरून त्या चालवत आजूबाजूच्या रोडने पुढे विद्यापीठाकडून औंध मार्गे हायवेने जात होते. तसेच पुढे हायवेवर सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याने ते पुढे कुठे जातात ते कळत नव्हते. शेवटी तपास पथकातील पोलीस शिपाई सोमनाथ कांबळे व पोलीस शिपाई संदीप साळवे यांनी औंध येथे सापळा रचून शेवटी दोन चोरांना पहाटेच्या वेळी रंगेहाथ पकडले आहे. आरोपींनी झटापट करून पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र, पोलिसांनी त्यांना शिताफीने बेड्या ठोकल्या आहेत.

आरोपींना शिताफीन पकडले - त्यात मुख्य आरोपी बुद्धदेव विश्वास हा अतिशय चलाख व चपळ होता. तो उच्चभू वस्तीत महागड्या सायकल हेरून त्या सायकलचे कुलूप कटरने काढून सायकली चोरायचा व त्या सायकली वेगवेगळ्या ठिकाणी पार्क करून ठेवायचा. परत दोन दिवसांनी दुसरे कपडे बदलून त्या सायकली घेऊन जायचा. त्याला मदतीसाठी त्याच्या गावच्या जयंता विश्वास हा चायनीज गाडीवाला या मित्राला मदतीला घेऊन तो हे काम करत होता. तसेच महागड्या सायकली विकून व मिळालेल्या पैशातून तो ऐश करायचा. सायकल चोरून भरपूर पैसा मिळाला असल्याने त्याने कोलकात्याला कायमचे निघून जाण्यासाठी विमानाचे तिकीटही काढले होते. मात्र, त्या अगोदरच स्वारगेट पोलिसांनी त्याचा डाव उधळला आणि त्याला ताब्यात घेतले आहे.

Last Updated : Apr 20, 2022, 8:26 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.