पुणे पुण्यातील औद्योगिक वसाहत असलेल्या चाकण एमआयडीसीच्या Chakan MIDC मेदनकरवाडीत एका चार वर्षीय मुलीचे अपहरण झाल्याचा गुन्हा चाकण पोलिसांत दाखल होता. त्यानंतर काही तासांतच जवळच्या शेतात कुत्र्यांनी लचके घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला 4 Year Minor Girl in Chakan Area होता. या घटनेमुळे पिंपरी-चिंचवड पोलीसदेखील चक्रावले Pimpri Chinchwad Police आहेत. दरम्यान, शवविच्छेदन अहवालात मुलीच्या छातीवर बोथट आघात झाल्याचे पुढे आले असून, खुनाचा (३०२) गुन्हा Case of Murder 302 has been Registered दाखल करण्यात आला आहे.
चाकण पोलिसांकडून माहिती देण्याचे आवाहन या प्रकरणी कोणाला काही माहिती असल्यास पोलीस ठाण्यात माहिती द्यावी. माहिती देणाऱ्या व्यक्तीचे नाव गुप्त ठेवण्यात येईल, अस पत्रकच चाकण पोलिसांनी काढले आहे. मुलीचा अज्ञात व्यक्तीने खून केल्याचा संशय पोलिसांना आहे, त्याचा शोध पोलीस घेत आहेत. मृत्यू झालेल्या मुलीचे कुटुंब चार दिवसांपूर्वी मेदनकरवाडीत राहण्यास आले आहे. त्यात अशी घटना घडल्याने त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. चाकण पोलिसांनी या घटनेबाबत कोणाला काही माहिती असल्यास पिंपरी-चिंचवड, चाकण पोलिसांना माहिती देण्यात यावी, असे आवाहन पत्रकाद्वारे करण्यात आले आहे. घटनेबाबत माहिती देणाऱ्या व्यक्तीच नाव गुप्त ठेवण्यात येईल, असेदेखील नमूद करण्यात आले आहे.
मुलीच्या अपहरणाची दिली होती पोलिसांत तक्रार बुधवार १०ऑगस्ट रोजी दुपारी चार वर्षीय मुलगी घरापासून बेपत्ता झाली होती. कुटुंबीयांनी दिवसभर तिचा शोध घेतला, अखेर रात्री चाकण पोलिसात येऊन अपहरण झाल्याची तक्रार दिली. पोलीस मुलीचा शोध घेतच होते. तेवढ्यात दुसऱ्या दिवशी ११ ऑगस्ट रोजी मुलगी राहत असलेल्या घराच्या काही अंतरावर मृतावस्थेत आढळली. मुलीचे कुत्र्यांनी लचके तोडल्याचे पोलीस सांगतात. मृतदेहाचा कंबरे खालील भाग नाही, त्यामुळे पोलीसांच्या शोधत अनेक अडथळे येत आहेत.
शवविच्छेदन अहवालात छातीवर बोथट आघात दरम्यान, शवविच्छेदन अहवालात छातीवर बोथट आघात झाल्याने मुलीचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी चाकण पोलीसांनी कलमवाढ करून ३०२ हे कलम वाढवले आहे. मुलीसोबत काही अघटित घडले आहे का? याबाबत शंका आहे. या गुन्ह्याचा छडा लावणे पिंपरी-चिंचवड पोलिसांसमोर मोठे आव्हान असणार आहे. मावळात सात वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिचा खून करण्यात आला होता. या प्रकरणी आरोपी तेजस दळवीला अटकदेखील करण्यात आली आहे. अवघ्या महाराष्ट्रातून आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी म्हणून मागणी होत आहे. त्यात चाकणमधील घटना धक्कादायक मानली जात आहे.
हेही वाचा Maharashtra Breaking News हरियाणातील आमदार धमकी प्रकरणी हरियाणा एसटीएफकडून 6 जणांना अटक