पुणे :- भाजपाचे साडेतीन लोक कोण? त्यांच्याबद्दल संजय राऊत काय बोलणार? या सगळ्याकडे आता लक्ष लागून राहिलं आहे.यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुप्रिया सुळे म्हणाले मला याबाबत माहिती नाही. याकडे राज्य नाही तर देश अपेक्षेने बघत आहे. ते काय म्हणतात त्याची वाट बघूया. ते आपल्या हिताचे सांगत असल्याचेही सुळे म्हणाल्या. पुण्यातील एका खाजगी वृत्तपत्राच्यावतीने आयोजित जनसेवक पुण्याचा गौरव सोहळ्यात खासदार सुप्रिया सुळे बोलत होत्या. या कार्यक्रमाला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील,खासदार सुप्रिया सुळे उपस्थित होते.
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपाला आव्हान देत शड्डू ठोकला आहे. पुढच्या काही दिवसात भाजपाचे साडेतीन लोक अनिल देशमुखांच्याच कोठडीत असतील आणि अनिल देशमुख बाहेर असतील, असा इशाराही त्यांनी काल दिला आहे. त्यानंतर आज शिवसेना भवनात संजय राऊत पत्रकार परिषद घेणार आहेत. त्यामुळे आता या पत्रकार परिषदेत राऊत कोणते नवे खुलासे करणार? याबद्दल सगळ्यांच्या नजरा रोखल्या आहेत.
नोटिसा कशा विरघळतात हे देवाला माहिती
विरोधी पक्षातील नेत्यांवर ईडी,सीबीसाय आणि इन्कम टॅक्सची चौकशी होत आहे. हे दुर्दैवी असून केंद्र सरकार सातत्याने याच्या माध्यमातून गैरवापर करण्यात येत आहे. कोणी विरोधात बोललं की लगेच नोटीस पाठवली जात आहे. आणि हे फक्त विरोधी पक्षातच कस होत आहे. याचाही विचार सर्वांनी केलं पाहिजे. विशेषकरून विरोधात असल्यास नोटिशी येतात. व भाजपात गेला की या नोटिसा विरघळून जातात हे देवालाच माहिती आहे, असेही त्या म्हणाल्या.
याच उत्तर हे केंद्र सरकारला द्यावं लागेल
देशातील सर्वात मोठा घोटाळा गुजरात येथील बँकेत 2200 कोटींचा झाला आहे. यावर सुळे म्हणाल्या की देशातील कुठल्याही राज्यात घोटाळा होऊ द्या याची जबाबदारी ही केंद्राची असते. गेली सात वर्षे केंद्रात भाजपचच सरकार आहे. सात वर्षे काय करत होत. एवढं पारदर्शक सिस्टम जर त्यांचं होत तर सात वर्षात काय केलं. याची चर्चा आम्ही पार्लमेंटमध्ये करणार आहे. आणि याच उत्तर हे केंद्र सरकारला द्यावं लागेल असेही सुळे म्हणाल्या.
सोमय्यांचे आरोप सिरीयलमधील जाहिराती
किरीट सोमय्या यांच्या आरोपावर सुळे म्हणाल्या की हे अतिशय दुर्दैवी असून राज्याच्या राजकारणात असं कधीच झालेलं नाही. आरोप करावं पण त्यासाठी सिस्टम आहे. रोज पत्रकार परिषद घेऊन आरोप करणे हा नवीनच ट्रेंड आला आहे.आणि हे टीव्ही सिरीयलमधील जाहिरातीसारखं झाल्याचेही सुळे म्हणाल्या.
मी त्यांच्याशी चर्चा करेल
मराठा आरक्षणाबाबत छत्रपती संभाजी राजे हे पुन्हा एकदा आंदोलन करणार आहे यावर केंद्राशी सर्वांनी बोललं पाहिजे. आंदोलन करायचं का नाही हा त्यांचा अधिकार आहे. पण याबाबत मी त्यांच्याशी चर्चा करणार आहे. की त्यांच्या मनात काय आहे हे जाणून घेईन खसादार सुप्रिया सुळे म्हणाल्या.
हेही वाचा - Goa Assembly Election Etv Bharat NewsRoom Live : मतदानानंतर सगळ्याच पक्षात अस्वस्थता! 10 मार्चला चित्र होणार स्पष्ट