पुणे - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सांगलीतील इस्लामपुरात उपस्थिती लावणार आहेत. यावेळी शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी सांगली बंदचे आवाहन केले. यामागे सेनेचे खासदार संजय राऊत यांनी उदयनराजे भोसले यांच्याकडे छत्रपती कुळातील पुरावे मागितल्याची पार्श्वभूमी आहे. राऊत यांचा विरोध करण्यासाठी भिडेंच्या संघटनेने शहर बंदचे आंदोलन पुकारले आहे.
यावर बोलताना खासदार सुप्रिया सुळे यांनी संबंधित प्रकार दुर्दैवी असल्याचे म्हटले आहे. तसेच ज्या छत्रपतींनी आपल्याला कष्ट करायला शिकवलं, त्यांच्याशी निगडीत प्रकरणात बंद पुकारणे हे चुकीचे असल्याचे त्या म्हणाल्या. यामध्ये राजकीय षडयंत्र असल्याची शंका त्यांनी व्यक्त केली आहे.