ETV Bharat / city

Suicide News : मैत्रिणीने घेतला गळफास, धक्याने दुसरीने मारली उडी; बालमैत्रिणींने संपवले जीवन - Suicide of friends in Hadapsar

पुण्यात एक धक्कादायक घटना ( shocking incident in pune ) घडली आहे. हडपसरमध्ये मैत्रिणींची आत्महत्या (Friends commit suicide in Hadapsar ). एकीने गळफास घेतला तर दुसरीची इमारतीवरून उडी मारून आत्महत्या. दरम्यान आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. अचानक घडलेल्या घटनेमुळे एकच घबराट उडाली होती.

Suicide of friends
बालमैत्रिणींने संपवले जीवन
author img

By

Published : Sep 14, 2022, 2:13 PM IST

पुणे : पुण्यात एक धक्कादायक घटना ( shocking incident in pune ) घडली आहे. हडपसर येथील शेवाळवाडी परिसरात दोन तरुणींनी आत्महत्या ( Friends commit suicide in Hadapsar ) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एकीने गळफास लावून घेतला तर तिला रूग्णवाहिकेमधून घेऊन जाताना त्याच ठिकाणी दुसरीने इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारुन आत्महत्या केली. दरम्यान आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

कधी घडली घटना : सारिका हरिश्चंद्र भागवत वय १९ राहणार क्रिस्टल सोसायटी, शेवाळेवाडी आणि आकांक्षा औदुंबर गायकवाड वय १९ राहणार क्रिस्टल सोसायटी शेवाळेवाडी अशी आत्महत्या केलेल्या दोन तरुणीची नावे असून, ही घटना शेवाळवाडी गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेजवळ क्रिस्टल सोसायटी या इमारतीत सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास घडली आहे.

अचानक घडलेल्या घटनेमुळे स्थानिकांची घबराट : आकांक्षा आणि सारिका या दोघी बाल मैत्रिणी होत्या. मंगळवारी संध्यकाळी सातच्या सुमारास सारिका हिने राहत्या घरी साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. गळफास घेतल्याची माहिती पोलिसांना मिळताच पोलिस कर्मचारी घटनास्थळी पोहोचले होते. तिचा मृतदेह पोलीस रूग्णवाहिकेमध्ये घेऊन जात असतानाच, आकांक्षाने पहिले आणि तिने त्याच इमारतीचा पाचवा मजला गाठला. पाचव्या मजल्यावरून उडी मारली. ती रुग्णवाहिकेजवळ पडली. उंचीवरून पडल्यामुळे गंभीर जखमी झाल्याने तिचाही मृत्यू झाला. अचानक घडलेल्या घटनेमुळे एकच घबराट उडाली होती. आत्महत्येचे कारण अद्याप समजलेले नाही.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.