ETV Bharat / city

Sugar Production In Maharashtra पुढील हंगामात विक्रमी साखर उत्पादन, साखर आयुक्तालयाचा अंदाज - Thirteen lakh tonnes of sugar production

साखर आयुक्तालयाने Sugar Commissionerate Maharashtra वर्तविलेल्या अंदाजानुसार इथेनॉल निर्मितीसाठी Ethanol Production वळविण्यात येणारी सुमारे १२ लाख टन साखर वगळून आगामी हंगामात १३८ लाख टन साखर उत्पादन sugar production होणार आहे. राज्यातील उसाचे Sugarcane area in Maharashtra क्षेत्र १४ लाख ८७ हजार ८३६ हेक्टरवर गेल्याचेही अंदाजात नमूद करण्यात आले आहे.

sugar complex
साखर संकुल
author img

By

Published : Aug 20, 2022, 9:01 PM IST

पुणे : संपलेल्या गळीत हंगामाप्रमाणे आगामी गळीत हंगामही विक्रमी ठरणार आहे. साखर आयुक्तालयाने वर्तविलेल्या अंदाजानुसार इथेनॉल निर्मितीसाठी Ethanol Production वळविण्यात येणारी सुमारे १२ लाख टन साखर वगळून आगामी हंगामात १३८ लाख टन साखर उत्पादन sugar production होणार आहे. राज्यातील उसाचे Sugarcane area in Maharashtra क्षेत्र १४ लाख ८७ हजार ८३६ हेक्टरवर गेल्याचेही अंदाजात नमूद करण्यात आले आहे.

मागील वर्षांच्या तुलनेत अधिक ऊस उपलब्ध - आगामी गळीत हंगामाविषयी साखर आयुक्तालयाने Sugar Commissionerate Maharashtra वर्तविलेल्या अंदाजानुसार, गळितासाठी १४ लाख ८७ हजार ८३६ हेक्टरवरील ऊस उपलब्ध असणार आहे. मागील हंगामात ऊसतोड झालेल्या क्षेत्रापेक्षा सध्याचे ऊसक्षेत्र सरासरी हजार हेक्टरने अधिक असणार आहे. सरासरी हेक्टरी ९५ टन प्रमाणे उत्पादन गृहीत धरले असता हंगामासाठी एकूण १४१३ लाख टन ऊस उपलब्ध असणार आहे. मागील वर्षांच्या तुलनेत सरासरी १०० लाख टन अधिक ऊस उपलब्ध होणार आहे. या एकूण उसापैकी ९५ टक्के ऊस गाळपासाठी येईल, असे गृहीत धरल्यास १३४३ लाख टन ऊस प्रत्यक्षात साखर कारखान्यांत गाळपासाठी येईल. सरासरी ११.२० टक्के साखर उतारा गृहीत धरल्यास १५० लाख टन साखर उत्पादन होण्याची शक्यता आहे. इथेनॉल निर्मितीसाठी १२ लाख टन साखरेचा संभाव्य उपयोग गृहीत धरल्यास प्रत्यक्षात राज्यात १३८ लाख टन साखर उत्पादन होईल. हे साखर उत्पादन मागील वर्षांच्या तुलनेत एक लाख टनांनी अधिक असेल, असा अंदाज साखर आयुक्तालयाने वर्तविला आहे.

एकरी उत्पादनात वाढ - मराठवाडय़ात ऊसतोडणी करताना कारखान्यांच्या नाकीनऊ आले होते. पश्चिम महाराष्ट्रात सरासरी १५० दिवस आणि जालन्यात २०० दिवस हंगाम चालला होता. यंदाही मराठवाडय़ात सर्वदूर चांगला पाऊस Good rain everywhere in Marathwada झाला आहे. धरणे भरली आहेत. त्यामुळे उसाला पाणी कमी पडणार नाही. उसाचे एकरी उत्पादन वाढण्याची The yield per acre of sugarcane will increase शक्यता आहे. त्यामुळे यंदाही मराठवाडय़ातील ऊस वेळेत तोडणी होण्याची शक्यता कमीच आहे. शेतकरी आणि कारखान्यांची होणारी संभाव्य दमछाक टाळण्यासाठी आतापासूनच काटेकोर नियोजन करण्याची गरज आहे.

ऊसतोडणी यंत्रे खरेदीसाठी प्रोत्साहन - सांगली, बीड, जालन्यात क्षेत्र वाढले बीड जिल्ह्यात मागील हंगामात तोडणी झालेले क्षेत्र ४९ हजार ५८१ हेक्टर होते. यंदा त्यात मोठी भर होणार असून, ८४ हजार २०८ हेक्टर क्षेत्र तोडणीसाठी उपलब्ध असणार आहे. जालन्यात मागील हंगामात ३४ हजार ४३४ हेक्टर क्षेत्रावरील उसाची तोडणी झाली होती. यंदा ४७ हजार २२७ हेक्टरवरील ऊस तोडणीसाठी उपलब्ध असणार आहे. मागील हंगामात सांगली जिल्ह्यात ९२ हजार ७१५ हेक्टरवरील उसतोडणी झाली होती. आता १३ लाख ७ हजार ५८५ हेक्टरवरील ऊस तोडणीसाठी उपलब्ध असणार आहे. यंदाचा हंगाम गळीत हंगाम एक ऑक्टोबरपासून सुरू करण्याचे नियोजन आहे. ज्या कारखान्यांना शक्य आहे त्यांची गाळप क्षमता वाढविण्यावर भर आहे. ऊसतोडणी यंत्रे खरेदीसाठी प्रोत्साहन Incentives for purchase of sugarcane harvesting machinery देण्यात येत आहे. ऊसक्षेत्राची ठोस माहिती मिळविण्यासाठी ई-पीक पाहणीतील E crop inspection आकडेवारीची मदत घेतली जाणार आहे. साखर आयुक्त शेखर गायकवाड सांगितले आहे.

हेही वाचा - Deepak Kesarkar देवेंद्र फडणवीसांमुळेच शिवसेना 2017 मध्ये मुंबईत सत्तेत, दीपक केसरकरांचा दावा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.