ETV Bharat / city

​आवडीच्या महाविद्यालयात प्रवेश न मिळाल्याने तरुणाची आत्महत्या - आत्महत्या

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आकाशला पुण्यातील शाहु महाविद्यालयात विज्ञान शाखेत प्रवेश घ्यायचा होता. मात्र, त्याला प्रवेश मिळाला नाही. त्यामुळे नैराश्येच्या गर्तेत जाऊन त्याने आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने रोहन नावाच्या मित्राला ‘रोहन आय विल गोईंग टू डू सुसाईड’ असा मेसेज व्हाट्सअॅपवरुन पाठवला होता. त्यानंतर मंगळवारी रात्री साडेअकराच्या सुमारास राहत्या घरात गळफास लावून आकाशने आत्महत्या केली. आज त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.

​आवडीच्या महाविद्यालयात प्रवेश न मिळाल्याने तरुणाची आत्महत्या
author img

By

Published : Aug 22, 2019, 12:00 AM IST

पुणे - आपल्याला हव्या असणाऱ्या महाविद्यालयात बारावीसाठी प्रवेश मिळाला नाही म्हणून पुण्यातील एका विद्यार्थ्याने आत्महत्या केली. आकाश ज्ञानेश्वर सदाफुले (वय 18) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. आकाश पुण्याच्या जनता वसाहतीत राहत होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आकाशला पुण्यातील शाहु महाविद्यालयात विज्ञान शाखेत प्रवेश घ्यायचा होता. मात्र, त्याला प्रवेश मिळाला नाही. त्यामुळे नैराश्येच्या गर्तेत जाऊन त्याने आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने रोहन नावाच्या मित्राला ‘रोहन आय विल गोईंग टू डू सुसाईड’ असा मेसेज व्हाट्सअॅपवरुन पाठवला होता. त्यानंतर मंगळवारी रात्री साडेअकराच्या सुमारास राहत्या घरात गळफास लावून आकाशने आत्महत्या केली. आज त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

आकाशच्या आत्महत्येला महाविद्यालयच जबाबदार आहे असे म्हणून पालकांनी प्राचार्यांच्या केबिनबाहेर आकाशचा मृतदेह ठेवला. यावेळी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र वेळीच दत्तवाडी पोलिसांनी हस्तक्षेप केला. पालकांना समजावून मृतदेह ताब्यात घेऊन अंत्यसंस्कार करण्याची विनंती केली. पालकांनी महाविद्यालयाविरोधात तक्रार दाखल करण्याचा अर्ज पोलिसांना दिला आहे. यावर पोलिसांकडून योग्य ती माहिती घेऊन त्यानुसार कारवाई केली जाणार असल्याचे सांगितले आहे.

Intro:(फाईल फोटो वापरावा)

आपल्याला हव्या असणा-या महाविद्यालयात बारावीसाठी प्रवेश मिळाला नाही म्हणून एका विद्यार्थ्याने आत्महत्या केली. पुण्याच्या जनता वसाहतीत हा प्रकार घडला.. आकाश ज्ञानेश्वर सदाफुले (वय 18, रा. जनता वसाहत) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. याप्रकरणी विद्यार्थ्याच्या पालकांनी संबंधित महाविद्यालयावर कारवाई करावी. असा अर्ज दत्तवाडी पोलिस ठाण्यात दिला आहे. Body:पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आकाशला पुण्यातील शाहु महाविद्यालयात विज्ञान शाखेत प्रवेश घ्यायचा होता. त्याने अकरावीपर्यंतचे शिक्षण एस पी महाविद्यालयातून पूर्ण केले होते. मात्र त्याला प्रवेश मिळाला नाही. यामुळे नैराश्याच्या गर्तेत जाऊन त्याने आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने रोहन या आपल्या मित्राला ‘ रोहन आय विल गोईंग टू सुसाईड’ असा मेसेज व्हाटसअपवरुन पाठवला होता. त्यानंतर मंगळवारी रात्री साडेअकराच्या सुमारास राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. आज त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहे. Conclusion:आकाशच्या आत्महत्येला
महाविद्यालयच जबाबदार आहे. असे म्हणून पालकांनी प्राचार्यांच्या केबिनबाहेर आकाशचा मृतदेह ठेवला. यावेळी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र वेळीच दत्तवाडी पोलिसांनी हस्तक्षेप करुन पालकांना समजावून मृतदेह ताब्यात घेऊन अंत्यसंस्कार करण्याची विनंती केली. त्यानंतर पोलिसांनी पालकांना व्यवस्थित समजावून मार्गदर्शन केले. पालकांनी महाविद्यालयाविरोधात तक्रार दाखल करण्याचा अर्ज पोलिसांना दिला आहे. यावर पोलिसांकडून योग्य ती माहिती घेऊन त्यानुसार कारवाई केली जाणार असल्याचे सांगितले.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.