ETV Bharat / city

Student Made E Bike : भंगाराच्या साहित्यातून 'रँचो'ने बनवली ई- बाईक, 50 किलोमीटर धावते

author img

By

Published : Oct 16, 2022, 5:23 PM IST

हणमंत सुरवसे नामक विद्यार्थ्यांने अवघ्या 30 हजार (student made e bike for 30 thousand rupees) रुपयांमध्ये, 50 किलोमीटर धावणारी ई- बाईक (bike that runs 50 kilometers) तयार केली आहे. पिंपरी-चिंचवडमधील थेरगाव माध्यमिक विद्यालयात ऑटोमोबाईल चे धडे दिले जातात, यातून हणमंतला प्रेरणा मिळाली आणि त्याने ही ई- बाईक साकारली आहे.

Student Made E Bike
विद्यार्थ्याने बनवली 30 हजार रुपयांत ई- बाईक

पिंपरी-चिंचवड : महानगर पालिकेच्या शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांने अवघ्या 30 हजार (student made e bike for 30 thousand rupees) रुपयांमध्ये, 50 किलोमीटर धावणारी ई- बाईक (bike that runs 50 kilometers) तयार केली आहे. यामुळं पिंपरी-चिंचवडमधील थेरगाव माध्यमिक विद्यालयाचे (Thergaon Secondary School) विशेष कौतुक होत आहे. हणमंत सुरवसे असं ई- बाईक साकारणाऱ्या रँचो च नाव आहे. थेरगाव माध्यमिक विद्यालयात ऑटोमोबाईल चे धडे दिले जातात, यातून हणमंतला प्रेरणा मिळाली आणि त्याने ई- बाईक साकारली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करतांना विद्यार्थी व प्रशिक्षक

दोन महिन्यात साकारली बाईक : कोरोना काळात हणमंत बसून असायचा आपण काहीतरी करायला हवं, ही जिद्द त्याला शांत बसू देत नव्हती. त्यामुळं तो नवनवीन प्रयोग करायचा. हणमंत हा थेरगाव येथील महानगर पालिकेच्या विद्यालयात इयत्ता दहावीत शिक्षण घेतो आहे. शाळेत संतोष शेंडगे हे ऑटोमोबाईल प्रशिक्षण देतात. त्यांचं पाठबळ मिळवून हणमंतने काही मुलांना सोबत घेऊन स्क्रॅबचं साहित्य आणलं, त्यामधून ई- बाईक साकारली आहे. 50 किलोमीटर धावणारी ई- बाईक सर्वांच लक्ष वेधून घेत आहे. तसेच, इतर विद्यार्थ्यांना प्रेरणा देतेय. अवघ्या दोन महिन्यात त्याला हे यश मिळालं आहे.

बघण्याचा दृष्टीकोन बदला : इंजिनिअरिंग च्या विद्यार्थ्यांना देखील लाजवेल अशी कामगिरी दहावीत शिकणाऱ्या या रँचोने करून दाखवली असल्याचं, प्रशिक्षक संतोष शेंडगे यांनी सांगितलं आहे. अनेकदा महानगर पालिकेची शाळा म्हटलं की पालक नाक मुरडतात आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळेकडे वळतात. पण, थेरगाव येथील महानगर पालिकेच्या शाळेत शिकणाऱ्या या विद्यार्थ्यांनी हे दाखवून दिलं की, आम्ही देखील काही कमी नाही. त्यामुळं पालकांनो महानगर पालिकेच्या शाळेकडे बघण्याचा दृष्टीकोन बदला. उद्या तुमचा मुलगा देखील अशी रँचो कामगिरी करु शकते.

कौतुकास्पद कामगिरी : विद्यार्थ्यांन मधील कौशल्य ओळखुन जर का त्यांच्या कला गुणांना प्रेरणा दिली, तर हजारो रॅंचो या महाराष्ट्रातुन घडायला वेळ लागणार नाही. कोरोना काळाचा सदुपयोग करुन या दहवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने केलेले कार्य खरोखरच कौतुकास्पद आहे. अनेकदा महानगर पालिकेच्या शाळांकडे बघण्याचा पालकांचा व समाजाचा दृष्टिकोन फार संकुचित असतो. याच महानगर पालिकेच्या शाळेमधुन प्रेरणा घेऊन या मुलाने केलेली कामगिरी खरोखरचं कौतुकास्पद आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.