ETV Bharat / city

Sidhu Musewala Murder Case : संतोष जाधवची आई म्हणते,'...तर मी मुलाला पाठिशी घालणार नाही' - मी मुलाला पाठिशी घालणार नाही

सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणातील दोन संशयित संतोष जाधव आणि सौरभ महाकाल ( Suspects Santosh Jadhav and Saurabh Mahakal ) हे दोघे पुण्याचे असल्याचे स्पष्ट झाले आहे. यातील संतोष जाधव हा मंचरचा राहणारा आहे. मंचरचा सराईत गुन्हेगार असलेल्या ओंकार बाणखेले प्रकरणातील खुनाचा तो आरोपी आहे. हत्येनंतर पुणे क्राईम ब्रँच त्याच्या शोधात आहे. पुणे जिल्ह्यात मंचरमध्ये त्याची आई राहते. संतोष एवढा शूटर होऊ शकत नाही. जर तो असेल तर मी मुलाला पाठिशी घालणार नाही, असे संतोषची आई सीता जाधव ( Sita Jadhav ) यांनी सांगितले आहे.

Suspects Santosh Jadhav
Suspects Santosh Jadhav
author img

By

Published : Jun 6, 2022, 8:43 PM IST

Updated : Jun 6, 2022, 9:33 PM IST

पुणे - पंजाबी गायक आणि काँग्रेस नेते सिद्धू मुसेवाला यांची दिवसाढवळ्या गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या हत्येमागे आत्ता पुणे कनेक्शन असल्याचे स्पष्ट झाले आहे. पंजाब पोलिसांनी देवेंद्र उर्फ काला याला अटक केली आहे. पण इतर दोन संशयित संतोष जाधव आणि सौरभ महाकाल ( Suspects Santosh Jadhav and Saurabh Mahakal ) हे दोघे पुण्याचे असल्याचे स्पष्ट झाले आहे. यातील संतोष जाधव हा मंचरचा राहणारा आहे. मंचरचा सराईत गुन्हेगार असलेल्या ओंकार बाणखेले प्रकरणातील खुनाचा तो आरोपी आहे. हत्येनंतर पुणे क्राईम ब्रँच त्याच्या शोधात आहे. पुणे जिल्ह्यात मंचरमध्ये त्याची आई राहते. संतोष एवढा शूटर होऊ शकत नाही. जर तो असेल तर मी मुलाला पाठिशी घालणार नाही, असे संतोषची आई सीता जाधव ( Sita Jadhav ) यांनी सांगितले आहे.

प्रतिक्रिया देताना संतोष जाधवची आई

'आपल्या मुलाला पाठिशी घालणार नाही' : मंचर येथे राहत असलेल्या सीता जाधव सांगतात दीड वर्षापूर्वी माझी शेवटची मुलाखत संतोषशी झाली होती. संतोषच्या सवयी या लहानपणापासून चांगल्या होत्या. पण जेव्हा त्याच्या वडिलांचे निधन झाले तेव्हापासून त्याच्या स्वभावात बदल झाला. मला जाणवायला लागले की तो मारामारी, भांडण करत आहे. मी त्याला नेहेमी सांगण्याचा प्रयत्न केला, पण त्याने कधीही माझे एकल नाही. नेहेमी मित्र मंडळीबरोबर तो राहत होता. त्याच्या वडिलांचे जसे निधन झाले तेव्हापासून तो आमच्याबरोबर राहत नव्हता, असेही सीमा जाधव यांनी सांगितले. संतोष आरोपी होण्यामागे त्याच्या मित्र मंडळींची वाईट संगतच कारणीभूत असल्याचे संतोषच्या आईने सांगितले आहे. चुकीचे काही केले असेल तर त्याची शिक्षा भोगून ये. आपल्या मुलाला पाठिशी घालणार नाही, असेही सीता जाधव यांनी सांगितले आहे.

हेही वाचा - Mobile Shop Theft Solapur : मोबाइल दुकान फोडत चोरट्यांनी केला दहा लाखांचा ऐवज लंपास

Last Updated : Jun 6, 2022, 9:33 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.