ETV Bharat / city

State Foreign Minister V. Muraleedharan : 'युक्रेनमधून आत्तापर्यंत 9 हजार लोकांना मायदेशी आणण्यात यश' - ऑपरेशन गंगा बाबत व्ही. मुरलीधरणची माहिती

4 तारखेपासून जेव्हा युद्धजन्य परिस्थिती सुरू झाली, तेव्हापासून ऑपरेशन गंगा सुरू करण्यात आली आहे. त्याआधी भारत सरकारकडून ज्या काही सूचना करण्यात आल्या आहे, त्यानुसार 24 तारखेच्या आधी 4 हजार विद्यार्थी हे भारतात आले होते. कालपर्यंत (सोमवारी) 9 हजार विद्यार्थी हे भारतात आले आहे किंवा ते बॉर्डरवर आहे, अशी माहिती परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. मुरलीधरण यांनी दिली आहे.

State Foreign Minister V. Muraleedharan
State Foreign Minister V. Muraleedharan
author img

By

Published : Mar 2, 2022, 7:18 PM IST

Updated : Mar 2, 2022, 7:38 PM IST

पुणे - रशिया आणि युक्रेनमध्ये गेल्या 7 दिवसांपासून युद्ध सुरू असून युक्रेनमध्ये 20 हजारहून अधिक विद्यार्थी अडकले आहे. ऑपरेशन गंगाच्या माध्यमातून युक्रेनमध्ये अडकलेल्या मुलांना भारतात आणले जात आहे. 24 तारखेपासून जेव्हा युद्धजन्य परिस्थिती सुरू झाली, तेव्हापासून ऑपरेशन गंगा सुरू करण्यात आली आहे. त्याआधी भारत सरकारकडून ज्या काही सूचना करण्यात आल्या आहे, त्यानुसार 24 तारखेच्या आधी 4 हजार विद्यार्थी हे भारतात आले होते. कालपर्यंत (सोमवारी) 9 हजार विद्यार्थी हे भारतात आले आहे किंवा ते बॉर्डरवर आहे. बाकीच्या 7 हजार विद्यार्थी हे युक्रेनच्या पूर्वीकडील भागात असल्याची माहिती परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. मुरलीधरण यांनी दिली आहे.

प्रतिक्रिया देताना परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. मुरलीधरण
'परिस्थिती पाहून निर्णय घेण्यात येत आहे'

युक्रेनमध्ये जी परिस्थिती निर्माण झाली आहे आणि जसजशी परिस्थिती बदलत जात आहे. त्यानुसार तेथील भारतीय नागरिकांना सूचना दिल्या जात आहे. गेल्या 4 ते 5 दिवसांपासून राजधानी कीवमध्ये जे विद्यार्थी होते त्यांना तेथील परिस्थिती पाहता सल्ला देण्यात आला होता की कीव सोडले तर ठीक. त्या विद्यार्थ्यांना तेथील पश्चिम विभागापर्यंत पुढे जायला हवे, असा सल्ला दिला जात आहे. त्याचप्रमाणे खारक्यूमधील जी माहिती मिळत आहे, त्याआधारे मुलांना माहिती दिली जात आहे, असे देखील यावेळी व्ही. मुरलीधरण यांनी सांगितले आहे.

'अडकलेल्या प्रत्येक भारतात आणण्यासाठी प्रयत्नशील'

भारत सरकार आश्वासन देत आहे की युक्रेनमध्ये अडकलेल्या प्रत्येक भारतीयाला सुरक्षित भारतात परत आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. हे भारत सरकारचा कमिटमेंट आहे. युक्रेन सैन्याकडून मारहाणीचे येत होते ते दोन दिवसांपूर्वीच होते. आत्ता परिस्थिती नियंत्रणात असून लवकरात लवकर विद्यार्थ्यांना भारतात परत आणण्यात येणार आहे. भारताचे 4 वरिष्ठ मंत्री हे ऑपरेशन गंगामध्ये सहभागी झाले असून विद्यार्थ्यांना सुरक्षित आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहे, असे देखील यावेळी व्ही मुरलीधरण यांनी सांगितले.

हेही वाचा - Russia Ukraine War : रशिया-युक्रेन युद्धावेळी भारताचा दुसरा बळी, आणखी एका विद्यार्थ्याचा मृत्यू

Last Updated : Mar 2, 2022, 7:38 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.