ETV Bharat / city

डॉक्टर तरुणीच्या बेडरूम आणि बाथरूममध्ये छुपा कॅमेरा; पुण्यातील नामांकित डॉक्टरला बेड्या

भारती विद्यापीठ हॉस्पिटलमध्ये प्रशिक्षणार्थी डॉक्टर म्हणून काम करणाऱ्या एका तरुणीच्या बेडरूम आणि बाथरूममध्ये छुपे कॅमेरे लावल्याचा प्रकार काही दिवसांपूर्वी उघडकीस आला होता.

spy camera
छुपा कॅमेरा
author img

By

Published : Jul 13, 2021, 4:32 PM IST

Updated : Jul 13, 2021, 4:56 PM IST

पुणे - शहरातील नामांकित भारती विद्यापीठ हॉस्पिटलमध्ये प्रशिक्षणार्थी डॉक्टर म्हणून काम करणाऱ्या एका तरुणीच्या बेडरूम आणि बाथरूममध्ये छुपे कॅमेरे लावल्याचा प्रकार काही दिवसांपूर्वी उघडकीस आला होता. या प्रकरणाचा उलगडा झाला आहे. पोलिसांनी या प्रकरणी शहरातील एका नामांकित डॉक्टरला बेड्या ठोकल्या आहेत. त्यानेच हे छुपे कॅमेरे या तरुणीच्या बेडरूम आणि बाथरूममध्ये लावल्याचे निष्पन्न झाले आहे. छुपा कॅमेरा असणारा बल्ब त्याने अमेझॉनवरून मागवला होता.

हेही वाचा - चंद्रपूरमध्ये जनरेटरचा स्फोट; एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

  • आरोपी डॉक्टरला अटक -

सुजित आबाजीराव जगताप (वय 42) असे अटक करण्यात आलेल्या डॉक्टरचे नाव आहे. याप्रकरणी 32 वर्षीय पीडित महिला डॉक्टरने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. 6 जुलै रोजी हा प्रकार घडला होता. आरोपी डॉक्टर हे एमडी आहेत. टिळक रस्त्यावरील हिराबाग चौकात त्यांचा मोठा दवाखाना आहे. भारती हॉस्पिटलमध्ये ते क्लासेस घेण्यासाठी जात होते.

  • तक्रारदार तरुणी ही प्रशिक्षणार्थी डॉक्टर -

या प्रकरणी अधिक माहिती अशी की, तक्रारदार तरुणी ही प्रशिक्षणार्थी डॉक्टर असून भारती विद्यापीठ परिसरातील क्वार्टरमध्ये अन्य एका सहकारी तरुणीसोबत राहत होती. सहा जुलै रोजी ती नेहमीप्रमाणे संध्याकाळी कामावरुन घरी परत आली होती. घरी आल्यानंतर घरातील लाईट लावण्याचा प्रयत्न केला असता ते लागले नाही. बाथरूममधील लाईटच्या बाबतीत देखील असाच प्रकार घडला. त्यानंतर तिने इलेक्ट्रिसीएनला बोलावले होते. इलेक्ट्रिशियन ने घरातील लाईटची तपासणी केली असता, त्यामध्ये छुपे कॅमेरे असल्याचे आढळून आले होते. त्यानंतर पीडित महिलेने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात या प्रकरणी तक्रार दिली होती.

  • भारती विद्यापीठ पोलिसांनी लावला तपास -

भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक संगीता यादव या प्रकरणाचा तपास करत होत्या. तपासादरम्यान त्यांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता, एके ठिकाणी संबंधित डॉक्टर कैद झाला होता. त्यानुसार पोलिसांनी डॉक्टर सुजित जगताप याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करीत अटक केली. त्यांना आज न्यायालयात हजर केले असता दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

हेही वाचा - कोणताही निर्णय घ्यायची एक योग्य वेळ असते, समर्थकांची समजूत काढताना पंकजा मुंडेंचे सूचक विधान

Last Updated : Jul 13, 2021, 4:56 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.