डिंभे/पुणे - उत्तर पुणे जिल्ह्यातील सह्याद्रीच्या पर्वतरांगा परिसरातील कुकडी प्रकल्पातील धरण परिसरात तुरळक प्रमाणात पाऊस होत आहे. यामुळे कुकडी प्रकल्पातील डिंभे धरणाच्या पाणी पातळीत थोडीफार वाढ झाली असून धरणाचा एकूण पाणीसाठा 70 टक्क्यांवर पोहोचला आहे.
कुकडी धरण प्रकल्प परिसरात तुरळक प्रमाणात पाऊस
गेल्या काही दिवसांपूर्वी सह्याद्री पर्वतरांगांमध्ये पावसाची दमदार बॅटिंग सुरु होती. त्यामुळे याच पावसात कुकडी प्रकल्पात एकूण पाच धरणे असून ही सर्व धरणे त्या पावसामुळे पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त क्षमतेने भरली आहे. पुढील काळामध्ये पावसाची संततधार सुरू राहिली तर पाचही धरणे लवकरच शंभर टक्के भरतील आणि पुणे, अहमदनगर व सोलापूर या जिल्ह्यातील शेती व पिण्याच्या पाण्याचा समस्या सुटून शेतकरी वर्गाला दिलासा मिळणार आहे. याचाच आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी तुषार झरेकर यांनी.
कुकडी प्रकल्पाती धरणे व पाणी पातळी
येडगाव धरण :- 78.64%
माणिकडोह धरण :- 33.43%
वडज धरण :- 54.14%
पिंपळजोगे धरण :- 23.00%
डिंबा धरण :- 70.14%
हेही वाचा - अतिवृष्टीमुळे सुमारे १७ हजार कुटुंब बेघर; नुकसानभरपाईचा आकडा वाढण्याची शक्यता