पुणे - कोरोनाचा लढाईत डॉक्टर-नर्स यांची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे. देशात महामारीला सुरुवात झाल्यापासून वैद्यकीय विभागातील सर्वांनीच शर्थ केली. राज्यात कोरोनाचा पहिला रुग्ण पुण्यातील महापालिकेच्या नायडू हॉस्पिटलमध्ये आढळला. याच नायडू रुग्णालयातील कोरोनाच्या सुरवातीपासून ते आतापर्यंत तब्बल अडीच हजारांहून अधिक रुग्णांवर उपचार केलेल्या कोरोना मर्दिनीची 'ईटीव्ही भारत' काहाणी वाचकांसाठी आणत आहोत. डॉ.नम्रता चंदनशिव या आजही नायडू रुग्णालयात कोरोना रुग्णांवर उपचार करत आहे. त्यांनाही कोरानाची लागण झाली होती. मात्र, त्यातून सावरून त्या पुन्हा कर्तव्यावर रुजू झाल्या.
तब्बल अडीच हजार कोरोना रुग्णांवर उपचार करणारी 'कोरोना मर्दिनी'
पुण्यातील महत्त्वाच्या नायडू सांसर्गिक रुग्णालयात मार्चमध्ये डॉ.नम्रता चंदनशिव रुजू झाल्या. मार्चमध्ये राज्यासह पुण्यातही कोरोनाच्या संसर्गाला सुरुवात झाली आणि नायडू रुग्णालयात कोरोना रुग्णांवर उपचार सुरू झाले. त्यावेळी मोजक्याच असलेल्या डॉक्टरांवर मोठी जबाबदारी आली. त्यातल्याच डॉ.नम्रता चंदनशिव यांनी आतापर्यंत अडीच हजाराहून अधिक रुग्णांवर उपचार केले आहेत.