पुणे - शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे ( Reble MLA Eknath Shinde ) यांच्या बंडामुळे राज्याचे राजकारण ढवळून निघाले ( Maharashtra Political Crisis ) आहे. सध्याच्या घडीला एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे आणि अपक्ष असे ४० हून अधिक आमदार ( 40 Reble MLA With Eknath Shinde )आहेत. त्यामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे.
या बंडाच्या पार्श्वभूमीवर आता राज्याच्या राजकारणात मोठी घडामोड घडली असून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस ( Opposition Leader Devendra Fadnavis ) यांनी देखील राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari ) यांची भेट घेतली आहे. यानंतर आता 30 जून रोजी राज्यपालांनी विशेष अधिवेशन बोलावले ( governor called special session ) आहे. असे सांगितल जाते आहे. यावर घटनातज्ञ उल्हास बापट ( Constitutional Expert Ulhas Bapat ) यांनी आपले मत व्यक्त केले आहे. आपले मत व्यक्त करताना त्यांनी अनेक गोष्टींवर प्रकाश टाकला आहे.
उल्हास बापट काय म्हणाले? - "बंडखोर आमदारांचा प्रश्न न्यायालयात असताना, आणि न्यायालयाने आहे तीच परिस्थिती ठेवावी असे सांगितले असताना, राज्यपाल बहुमत चाचणीसाठी अधिवेशन बोलवू शकत नाहीत". असे घटनातज्ञ उल्हास बापट म्हणाले आहेत.राज्यपालांचे जे पद आहे ते क्रिकेटमधील अंपायर सारखे असते. तेच पद आत्ता संशयाच्या भोवऱ्यात आले आहे. राज्यपालांना जर सत्र बोलवायचे असेल तर ते राज्याचे मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ यांच्या सल्ल्यानुसारच बोलवावे लागते. आत्ता राज्यपालांनी जे सत्र बोलावले आहे. ते घटनाबाह्य कृत्य आहे. ही परिस्थीती राज्यघटना विरोधी होणारी आहे. जर सुप्रीम कोर्टाने या निर्णयाला पाठिंबा दिला तर आम्हाला त्याप्रमाणे घटना शिकवावी लागेल. असे देखील यावेळी बापट म्हणाले.
हेही वाचा - MVA Govt In SC : राज्यपालांच्या निर्णयाविरोधात महाविकास आघाडी सरकार सर्वोच्च न्यायालयात, 5 वाजता सुनावणी