ETV Bharat / city

Sindhutai Sapkal Journey : ‘चिंधी’ ते ‘अनाथांची माय’ सिंधुताई सपकाळ यांचा जीवनप्रवास थक्क करणारा - अनाथांची माय सिंधुताई सपकाळ जीवनप्रवास

ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ (Sindhutai Sakpal) यांचे मंगळवारी ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्याच्यांवर पुण्यातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना एक महिन्यापूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर त्यांच्या वाट्याला संघर्ष आला. मात्र मोठ्या जिद्दीने त्यांनी या सर्वावर मात केली.

Sindhutai Sapkal
सिंधुताई सपकाळ
author img

By

Published : Jan 4, 2022, 11:58 PM IST

Updated : Jan 5, 2022, 2:22 AM IST

पुणे - सामाजिक कार्यकर्त्यां आणि 'अनाथांची माय' अशी ओळख असलेल्या सिंधुताई सपकाळ (Sindhutai Sapkal Death) यांचे पुण्यातील रुग्णालयात निधन झाले. सामाजिक कार्याबद्दल त्यांना भारत सरकारने पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. सिंधुताईंचा आयुष्याचा प्रवास खूपच थक्क करुन सोडणारा होता.

  • सिंधुताईंचं लहानपण -

सिंधुताई सपकाळ यांचा जन्म १४ नोव्हेंबर १९४७ रोजी वर्धा येथे झाला होता. वर्धा जिल्ह्यातील जंगल भागातील नवरगाव ही त्यांची जन्मभूमी. त्यांचे वडील अभिमान साठे गुरे वळायचे काम करायचे. घरातील गुरे राखायला गेलेल्या सिंधुताई शाळेत जाऊन बाहेर बसायच्या आणि शिकायच्या. चौथीपर्यंत त्यांनी आपलं शिक्षण पुर्ण केलं होतं. त्यांचा विवाह देखील वयाच्या अवघ्या ९ व्या वर्षी यांच्यापेक्षा 26 वर्षांनी मोठे असलेल्या श्रीहरी सपकाळ यांच्याशी झाला. त्यांचं वैवाहिक जीवन देखील अतिशय कठीण गेलं. वयाच्या अवघ्या अठराव्या वर्षापर्यंत माईंची तीन बाळंतपणं झाली होती.

  • ममता बाल सदन संस्थेची स्थापना -

अशा खडतर परिस्थितीतून अनाथ मुलांना सांभाळून त्यांच्या जीवनाला दिशा देण्यासाठी सिंधुताई यांनी ममता बाल सदन संस्थेची स्थापना केली. १९९४ साली पुण्याजवळ पुरंदर तालुक्यात कुंभारवळण या गावात ही संस्था सुरु झाली. आपली कन्या ममता हिला दगडूशेठ हलवाई संस्थेच्या माध्यमातून शिक्षणासाठी सेवासदन येथे दाखल केले आणि त्यांनी इतर अनाथ आणि बेवारस मुलांना आधार दिला. येथे लहान मुलांना सर्व शिक्षण दिले जाते. त्यांच्या भोजन, कपडे अन्य सुविधा यांची उपलब्धता संस्थेकडून केली जाते. शिक्षण पूर्ण झाल्यावर येथील मुले आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होतील यासाठीही त्यांना मार्गदर्शन दिले जाते. आर्थिक दृष्ट्या स्वयंपूर्ण झाल्यावर या युवक युवतींना योग्य जोडीदार शोधून देणे आणि त्यांच्या विवाहाचे आयोजन करणे हे कार्यही संस्थेकडूनच केले जाते.

  • सिंधुताई यांनी अन्य समकक्ष संस्थाही स्थापन केलेल्या -

बाल निकेतन हडपसर, पुणे

सावित्रीबाई फुले मुलींचे वसतिगृह , चिखलदर

अभिमान बाल भवन, वर्धा

गोपिका गाईरक्षण केंद्र, वर्धा ( गोपालन)

ममता बाल सदन, सासवड

सप्तसिंधु महिला आधार बालसंगोपन व शिक्षणसंस्था

त्यांच्या या कार्यासाठी त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आलं आहे. मागच्याच वर्षी त्यांना पद्मश्री या पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलं आहे. २०१२ साली महाराष्ट्र शासनाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्काराने देखील त्यांना गौरवण्यात आले आहे. सिंधुताईंना सुमारे ७५० राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.

  • आतापर्यंत मिळालेले पुरस्कार -

पद्मश्री पुरस्कार (२०२१)

महाराष्ट्र शासनाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार (२०१२)

पुण्याच्या अभियांत्रिकी कॉलेजचा 'कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुरस्कार' (२०१२)

महाराष्ट्र शासनाचा 'अहिल्याबाई होळकर पुरस्कार' (२०१०)

मूर्तिमंत आईसाठीचा राष्ट्रीय पुरस्कार (२०१३)

आयटी प्रॉफिट ऑर्गनायझेशनचा दत्तक माता पुरस्कार (१९९६)

सोलापूरचा डॉ. निर्मलकुमार फडकुले स्मृती पुरस्कार

राजाई पुरस्कार

शिवलीला महिला गौरव पुरस्कार

श्रीरामपूर-अहमदगर जिल्हा येथील सुनीता कलानिकेतन न्यासातर्फे कै सुनीता त्र्यंबक कुलकर्णी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिला जाणारा 'सामाजिक सहयोगी पुरस्कार' (१९९२)

सीएनएन-आयबीएन आणि रिलायन्स फाउंडेशनने दिलेला 'रिअल हीरो पुरस्कार' (२०१२).

२००८ - दैनिक लोकसत्ताचा - 'सह्याद्रीची हिरकणी पुरस्कार'.

प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती पुरस्कार (२०१५)

Last Updated : Jan 5, 2022, 2:22 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.