ETV Bharat / city

Smuggling fake notes : बांग्लादेशातून पुण्यात बनावट नोटांची तस्करी, लष्कर गुप्तचर विभाग व महसूल गुप्तचर विभागाकडून रॅकेट उद्ध्वस्त - Smuggling fake notes

बांग्लादेशातून पुण्यात बनावट नोटांची तस्करी करणाऱ्या तीन जणांना पुण्यातील खडकी परिसरातून अटक करण्यात आली आहे. लष्कराच्या गुप्तचर विभागाच्या माहितीवरून महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) बनावट नोटांचे बांग्लादेश कनेक्शन उघड करताना २ लाखांच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत. खडकी बाजार परिसरातील एका पानपट्टीचालकासह तिघांना अटक करून त्यांच्याकडून ५०० रुपयांच्या ४०० बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत.

Smuggling fake notes in pune
बांग्लादेशातून पुण्यात बनावट नोटांची तस्करी, 3 आरोपींना अटक
author img

By

Published : Oct 15, 2022, 1:00 PM IST

पुणे : पुण्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. बांग्लादेशातून पुण्यात बनावट नोटांची तस्करी करणाऱ्या तीन जणांना पुण्यातील खडकी परिसरातून अटक करण्यात आली आहे. लष्कराच्या गुप्तचर विभागाच्या माहितीवरून महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) बनावट ( busted by Army Intelligence and Revenue Intelligence )नोटांचे बांगलादेश कनेक्शन उघड करताना २ लाखांच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत. खडकी बाजार परिसरातील एका पानपट्टीचालकासह तिघांना अटक करून ( 3 accused arrested in smuggling fake notes case ) त्यांच्याकडून ५०० रुपयांच्या ४०० बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत.

2 लाखांच्या बनावट नोटा 26 हजारात - गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार गुड्डुने बांगलादेशाच्या सीमेवरून २ लाखांच्या या बनावट नोटा २६ हजार देऊन आणल्याचे तपासात सांगितले आहे. त्याला जेव्हा बनावट नोटांची आवश्यकता असते, तेव्हा तो बांग्लादेश सीमेवरील लोकांशी संपर्क साधून या बनावट नोटा तस्करी करून देशात आणत असल्याचे, पोलिसांना सांगितले आहे. अतुलकुमार नरेशकुमार मिश्रा (वय २३, रा. शेवाळे टॉवर्स, खडकी बाजार), रवी उर्फ सूरज वीरेंद्र शुक्ला (वय ३५, रा. नवा बाजार, खडकी), राजूलकुमार उर्फ गुड्डू भाई राजबहाद्दूर सेन (वय ४६, रा. लेक व्ह्यू सिटी, लोहगाव) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

लष्करातील गुप्तचर विभागाच्या अधिकाऱ्यांची माहिती - तसेच आरोपी अतुल कुमारची खडकी बाजार परिसरात पानपट्टी आहे. आरोपी रवी शुक्ला अतुलच्या पानपट्टीत काम करत होता. शुक्लाकडे बनावट नोटा होत्या. दोन लाख रुपयांच्या बनावट नोटा वितरित केल्यास ३० हजार रुपये मिळतील, असे रवीने अतुलला सांगितले होते. त्यानुसार अतुल दोन लाख रुपयांच्या बनावट नोटा घेऊन खडकी बाजार परिसरातून निघाला होता. एलफिन्स्टन रोडवर तो येणार असल्याची माहिती लष्कराच्या गुप्तचर विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली. त्यानंतर सापळा लावून अतुलला पकडण्यात आले असून त्याने दिलेल्या माहितीवरून राजूलकुमारला ताब्यात घेण्यात आले आहे.

आरोपीच्या घरातून साहित्य जप्त - अतुल मिश्राच्या घराची झडती घेतल्यानंतर त्याच्या घरातून १०० रुपयांच्या पंधरा बनावट नोटा, १०० रुपयांच्या नोटांचे कलरप्रिंट असलेले १९ पेपर, तीन कलर पेन आणि पेपर, तसेच कटिंगचे साहित्य जप्त केले आहे. तर रवी शुक्लाच्या घरातून दोन बनावट नोटा जप्त केल्या आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.