ETV Bharat / city

Sindhutai Sapkal Daughter Mamta : माई निघून नाही गेल्या तर वादळ होतं ते शांत झालं; ममता सपकाळ भावनिक - mamta sapkal emotional reaction

माई या निघून नाही गेल्या तर वादळ होतं ते शांत झाले. निघून गेल्या हा शब्द कोणीही वापरू नका. आईसारख्या व्यक्ती या कधीच निघून जात नाहीत तर त्या जिवंत असतात, अशी भावनिक प्रतिक्रिया सिंधुताई सपकाळ यांची मुलगी ममता सपकाळ (Mamta Sapkal) यांनी दिली आहे. हजारो लेकरांची माय (Mother of Orphans) सिंधुताई सपकाळ (Sindhutai Sapkal) यांचं मंगळवारी (4 जानेवारी) निधन झाले.

mamta sapkal
ममता सपकाळ
author img

By

Published : Jan 5, 2022, 3:10 AM IST

Updated : Jan 5, 2022, 4:10 AM IST

पुणे - माई या निघून नाही गेल्या तर वादळ होतं ते शांत झाले. निघून गेल्या हा शब्द कोणीही वापरू नका. आईसारख्या व्यक्ती या कधीच निघून जात नाहीत तर त्या जिवंत असतात, अशी भावनिक प्रतिक्रिया सिंधुताई सपकाळ यांची मुलगी ममता सपकाळ (Mamta Sapkal) यांनी दिली आहे. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या (Social Worker), हजारो लेकरांची माय (Mother of Orphans) सिंधुताई सपकाळ (Sindhutai Sapkal) यांचं मंगळवारी (4 जानेवारी) निधन झाले. पुण्यातील गॅलेक्सी रुग्णालयात उपचार सुरु असताना त्यांची प्राणज्योत मालवली. वयाच्या 74 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

  • माईंचे कार्य पुढे नेणार - ममता सपकाळ
    सिंधुताई यांची मुलगी ममता सपकाळ

सिंधुताई यांच्या निधनानंतर त्यांची मुलगी ममता सपकाळ यांनी भावनिक प्रतिक्रिया दिली. माई या निघून नाही गेल्या तर ते वादळ शांत झाले. आई या व्यवस्थित होत्या, सगळ्यांची काळजी घेत होत्या. त्यांना मुलांची काळजी होती. आईनी ज्या पद्धतीचे संस्कार आम्हाला दिले, ज्या पद्धतीचे काम त्यांनी केलं, त्याच पद्धतीचे काम हे आम्ही अशाच पद्धतीने पूढे नेणार आहोत, असे ममता सपकाळ म्हणाल्या.

  • सिंधुताई सपकाळ यांचे पुण्यात निधन -

सामाजिक कार्यकर्त्या आणि अनाथांची माय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिंधुताई सपकाळ (Sindhutai Sapkal) यांचे निधन झाले आहे. वयाच्या 74 व्या वर्षी पुण्यात अखेरचा श्वास घेतला आहे. आपल्या कार्याचा ठसा जनमानसात उमटवणा-या व्यक्तीमध्ये सिंधुताई सपकाळ यांचे नाव आदराने घेतले जाते.

सिंधुताई सपकाळ यांच्यावर पुण्यातील गॅलेक्सी रुग्णालयात उपचार सुरु होते. काही दिवसांपूर्वीच त्यांच्यावर गॅलेक्सी रुग्णालयातच हर्नियाचे ऑपरेशन करण्यात आले. त्यानंतर सिंधुताई यांना पुन्हा एकदा गॅलेक्सी रुग्णालयात दाखल करण्यात होते. सिंधुताईंवर आज (5 जानेवारी) शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

हेही वाचा - Sindhutai Sapkal passed away : अनाथांची माय काळाच्या पडद्याआड: आज दुपारी शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार

Last Updated : Jan 5, 2022, 4:10 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.