ETV Bharat / city

सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणी पुणे कनेक्शन, दोन संशयित पुण्याचे असल्याचा अंदाज - Sidhu Musewala murder case

सिद्धू मुसेवाला यांची पंजाबच्या मन्सा जिल्ह्यात रविवारी सायंकाळी जवाहरके गावामध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या हत्येमागे आता पुणे कनेक्शन असल्याचं सांगितलं जातं आहे. पंजाब पोलिसांनी देवेंद्र उर्फ काला याला अटक केली आहे. पण इतर दोन जे संशयित आहेत ते संतोष जाधव आणि सौरभ महाकाल हे असून हे दोघे पुण्याचे असल्याचे सांगितले जात आहे.

सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणी पुणे कनेक्शन, दोन संशयित पुण्याचे असल्याचा अंदाज

author img

By

Published : Jun 6, 2022, 11:11 AM IST

Updated : Jun 6, 2022, 3:48 PM IST

पुणे - पंजाबी गायक आणि काँग्रेसचे नेते सिद्धू मुसेवाला यांची पंजाबच्या मन्सा जिल्ह्यात रविवारी सायंकाळी जवाहरके गावामध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या हत्येमागे आता पुणे कनेक्शन असल्याचं सांगितलं जातं आहे. पंजाब पोलिसांनी देवेंद्र उर्फ काला याला अटक केली आहे. पण इतर दोन जे संशयित आहेत ते संतोष जाधव आणि सौरभ महाकाल हे असून हे दोघे पुण्याचे असल्याचे सांगितले जात आहे. पंजाबी गायक आणि काँग्रेसचे नेते सिद्धू मुसेवाला यांच्या हत्या प्रकरणी या दोघांविरोधात लूकआऊट नोटीस काढण्यात आली आहे. हे दोघेही गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असल्याचे सांगितले जात आहे.

पोलीस अधिकाऱ्याची प्रतिक्रिया

कोण आहे सतोष जाधव - मंचरचा सराईत गुन्हेगार ओंकार उर्फ रानिया बाणखेले याच्या खून प्रकरणात संतोष जाधव फरार आहे. पुणे गुन्हे शाखा संतोष जाधवच्या शोधात आहे. 'सूर्य उगवताच मी तुला संपवून टाकेन', असे स्टेटस संतोष जाधव यांनी सोशल मीडियावर टाकले होते. त्याला प्रत्युत्तर देताना ओंकारने संतोष जाधव यांना भेटून मारहाण करणार असल्याचे लिहिले. कोणीही येऊ द्या त्यानंतर 1 ऑगस्ट रोजी दुचाकीवरून आलेल्या शूटरने ओंकार उर्फ रानिया बाणखेले यांची भरदिवसा गोळीबार करून हत्या केली. हे दोघे ही लॉरेन्स बिष्णोईच्या टोळीमधले असल्याचे समोर येत आहे.

दोन संशयित पुण्याचे असल्याचा अंदाज
दोन संशयित पुण्याचे असल्याचा अंदाज

पुणे पोलिसांनी पंजाब पोलिसांना सांगितली होती संतोषची माहिती - संतोष जाधव हाच आरोपी असू शकतो. त्यावरून आज पंजाब पोलिसांनी ग्रामीण पोलिसांना विचारणा केली आहे. मुसेवालाची हत्या करण्यासाठी एकूण चार राज्यातून शूटर्स पंजाबमध्ये पाठवण्यात आले होते. 3 शूटर्स पंजाबमधील होते. 2 महाराष्ट्रातले, 2 हरियाणातले आणि यामधील एक शूटर्स हा राजस्थानमधील होता. पुणे ग्रामीण पोलिसांनी पंजाब पोलिसांना सी सी टीव्ही फुटेज पाहून संतोष जाधव याच्याबद्दल माहिती दिली होती.

Last Updated : Jun 6, 2022, 3:48 PM IST

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.