ETV Bharat / city

Sidhu Moose Wala Murder : सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणात मोठी कारवाई; फरार सौरभ महाकालला अटक - सौरभ महाकाल मराठी बातमी

पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाची काही दिवासांपूर्वी दिवासाढवळ्या गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. त्याप्रकरणातील पुणे जिल्ह्यातील फरार आरोपी शार्प शूटर सौरभ महाकालला अटक करण्यात आली ( Sidhu MooseWala Murder Saurabh Mahakal Arrested ) आहे.

Saurabh Mahakal Sidhu Moose Wala
Saurabh Mahakal Sidhu Moose Wala
author img

By

Published : Jun 8, 2022, 5:39 PM IST

Updated : Jun 8, 2022, 5:54 PM IST

पुणे - पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाची काही दिवासांपूर्वी दिवासाढवळ्या गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. त्याप्रकरणातील पुणे जिल्ह्यातील फरार आरोपी शार्प शूटर सौरभ महाकालला अटक करण्यात आली आहे. पुणे ग्रामीण पोलिसांनी ही कारवाई केल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. सौरभ महाकाल हा मागील मागील काही दिवसांपासून फरार ( Sidhu MooseWala Murder Saurabh Mahakal Arrested ) होता.

सिद्धू मुसेवाला याची पंजाबच्या मन्सा जिल्ह्यात 29 मे ला सायंकाळी जवाहरके गावामध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या हत्येमागे विष्णोई टोळीचा हात असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणात दहा हल्लेखोरांची नावे निष्पन्न झाली असून, त्यात पुण्यातील सौरभ महाकाल आणि त्याता साथीदार संतोष जाधवही हत्येत आरोपी आहेत. त्याच प्रकरणी आता पुणे पोलिसांनी कुख्यात गुंड सौरभ महाकाल याला अटक केली आहे. तर, त्याचा साथीदार संतोष जाधव हा अद्यापही फरार आहे.

पुणे ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिद्धेश कांबळे उर्फ सौरभ महाकाल याला नारायणगाव मधून अटक करण्यात आली आहे. सौरभ महाकाल याच्यावर याआधी मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. सौरभला अटक करून न्यायालयात हजर केल्यावर 20 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

संतोष जाधव अद्यापही फरार - संतोष जाधव हा 23 वर्षांचा असून, तो मूळचा आंबेगाव तालुक्यातील पोखरी गावचा रहिवाशी आहे. त्याचं मंचरमध्ये वास्तव्य होते. मंचर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राण्या उर्फ ओमकार बानखीलेचा 1 ऑगस्ट 2021 साली खून करण्यात आला होता. संतोष जाधव या खुनात सहभागी असल्याचा गुन्हा दाखल आहे.राण्या बानखीले खुनाच्या गुन्ह्यात त्याच्यावर मोक्का देखील लावण्यात आला असून, तो फरार आहे. या प्रकरणात त्याला तडीपार करण्यात आले होते. त्यानंतर त्याचे राजस्थान, पंजाब, हरियाणा या भागात वास्तव्य होते. येथेही त्याच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत.

हेही वाचा - Malshej Ghat Bus Conductor Suicide : माळशेज घाट दरीत उडी मारून एसटी वाहकची आत्महत्या, कारण अस्पष्ट

Last Updated : Jun 8, 2022, 5:54 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.