पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ( Savitribai Fule Pune University ) डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कारांचे वितरण ( Dr Babasaheb Ambedkar Award ) करण्यात आले. त्यावेळी सध्या सर्वत्र भोंग्याचं राजकारण सुरू असलं तरी तुमचा आमचा भोंगा हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मार्गावर चालणारा सत्याचा भोंगा ( Shripal Subnis Statement On Loudspeaker Politics ) आहे. सत्याचं राजकारण आहे, सत्याचं समाजकारण आणि अर्थकारण आहे, असे विचार ज्येष्ठ साहित्यिक श्रीपाल सबनीस यांनी केले. यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, अमेरिकेतील प्राध्यापक केविन ब्राऊन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टडीजचे विभागप्रमुख डॉ. विजय खरे आदी मान्यवर उपस्थित होते.
सर्वोत्कृष्ट ग्रंथ पुरस्कार 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचे दलितेतर सहकारी' या डॉ. योगीराज बागुल यांच्या ग्रंथाला प्रदान करण्यात आला. त्यासोबत तीन उत्तेजनार्थ पुरस्कारांमध्ये डॉ. सोमनाथ कदम यांचा 'आंबेडकरी चळवळीतील मातंग समाज' , तुकाराम रोंगटे यांचा 'आदिवासींचेही डॉ. बाबासाहेब आंबेडकर' आणि डॉ. विलास आढाव यांचा 'चिरेबंदी कृषी बाजार आणि दुर्बल शेतकरी' या ग्रंथांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. सर्वोत्कृष्ट कार्यकर्ता पुरस्कार डॉ. चित्रा कुरहे आणि सुभाष वारे यांना प्रदान करण्यात आला. उत्तेजनार्थ पुरस्कार डॉ. प्रकाश पवार, प्रा. डॉ. रोहिदास जाधव यांना देण्यात आला. तर संशोधनातील पुरस्कार जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील डॉ. मिलिंद आवाड यांना प्रदान करण्यात आला.
हेही वाचा - Rana VS Shivsena : मातोश्रीवर उद्या 9 वाजता हनुमान चालीसाचे पठण करणारच; रवी राणांचा निर्धार