ETV Bharat / city

Nana Bhangire Will Welcome CM : शिवसेनेचे माजी नगरसेवक नाना भानगिरे करणार मुख्यमंत्र्यांचे भव्य स्वागत - I am Eknath Shinde

शिवसेनेचे माजी नगरसेवक नाना भानगिरे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( CM Eknath Shinde ) यांचे हडपसर येथील व्यापारी मॉल येथे भव्य असे स्वागत करणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आषाढी एकादशीनिमित्त ( Ashadi Ekadashi ) पंढरपूर येथे जाणार असल्याने नाना भानगिरे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्वागत तसच भव्य सत्कार करणार आहेत. त्यासाठी त्यांनी जोरदार तयारी केली आहे.

Shiv Senas Pune corporator Nana Bhangire
शिवसेनेचे माजी नगरसेवक नाना भानगिरे
author img

By

Published : Jul 9, 2022, 5:33 PM IST

पुणे - शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या गटात शिवसेनेचे माजी नगरसेवक नाना भानगिरे ( Former Shiv Sena corporator Nana Bhangire ) हे सामील झाले. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( CM Eknath Shinde ) हे आज पुण्यावरून आषाढी एकादशीनिमित्त ( Ashadi Ekadashi ) पंढरपूर येथे जाणार असल्याने नाना भानगिरे हे शक्ती प्रदर्शन करणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा भव्य सत्कार हडपसर येथे करणार आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा करणार भव्य सत्कार - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर राज्यातील शिवसैनिक आक्रमक झाले होते. काहींनी शिंदेंविरोधात जोरदार आंदोलन केले. तर काहींनी शिंदे यांना समर्थन देखील केल्याचे चित्र राज्यात पाहायला मिळाले. पुण्यातील ही शिवसैनिकांकडून एकनाथ शिंदे यांना विरोध होत असताना पुण्यातील तीन वेळा नगरसेवक असलेले शिवसेनेचे नेते नाना भानगिरे हे काही दिवसांपूर्वीच शिंदे गटात सहभागी झाले आहेत.आणि आज ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा भव्य असा सत्कार करणार आहेत.

मीच एकनाथ शिंदे - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वागताची विशेष तयारी नाना भानगिरे यांनी केली आहे. मीच एकनाथ शिंदे ( I am Eknath Shinde ) अश्या आशयाची टोपी, टीशर्ट, ( I am Eknath Shinde hat, t-shirt, ) त्यांनी तयार करून घेतले आहेत. आणि ते टोपी, टीशर्ट घालून नाना भानगिरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्वागत करतील. हजारो शिवसैनिक हे हडपसर येथील व्यापारी मॉल येथे भव्य अस स्वागत करणार आहेत.

हेही वाचा - Devendra Fadnavis : शिवसेनेचे किती खासदार संपर्कात?, देवेंद्र फडणवीस म्हणाले...

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.