पुणे - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ( Shiv Sena chief Uddhav Thackeray ) त्यांच्या परिवाराविषयी अनुद्गार काढणाऱ्या रामदास कदम ( Ramdas Kadam ) यांच्या पोस्टरला जोडो मारून शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आलं ( Shiv Sena protest against Ramdas Kadam ) आहे. यावेळी शिवसैनिकांच्या वतीने बंडखोर आमदारांच्या ( Rebel MLA ) विरोधात जोरदार घोषणबाजी ( Slogans against rebel MLAs ) करण्यात आली.
शिवसैनिक आक्रमक - आमदार रामदास कदम म्हणाले की, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना ते कुठेही गेले तरी रश्मी वहिनी त्यांच्यासोबत असायच्या. माँसाहेब मीनाताई ठाकरे या आयुष्यात कधीही व्यासपीठावर चढल्या नाहीत. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना मंत्रालयात केवळ तीनवेळा गेले. इतरवेळी ते मातोश्रीवर लपून खोके मोजत बसायचे. रश्मी ठाकरे या वर्षा बंगल्यावर कंत्राटदारांना भेटायच्या.असा सणसणीत आरोप रामदास कदम यांनी केला आहे. याच्या निषेधार्थ शिवसैनिक आक्रमक झाले असून राज्यभर शिवसैनिकांच्या वतीने आंदोलन करण्यात आल आहे. या आंदोलनाच्या वेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व त्यांच्या परिवाराविषयी अनुद्गार काढणाऱ्या रामदास कदम यांच्या पोस्टरला जोडौ मारून निषेध व्यक्त करण्यात आला.
रामदास कदम यांना राज्यात फिरू देणार नाही - शिवसेनेने रामदास कदम यांना नेतेपद, आमदारकी दिली. विरोधी पक्षनेते पदासारखे मोठे पद कदम यांना दिले. मात्र, यानंतरही त्यांनी उपकाराची परतफेड बंडखोरीने केली. पक्षाच्या नेत्यांविरोधात आक्षेपार्ह विधान करणार्या कदम यांना भविष्यात पश्चात्ताप झाल्याशिवाय राहणार नाही. रामदास कदम यांना तब्बल दोन वेळा शिवसेनेने विधानपरिषद दिली. विधान परिषदेतून पर्यावरण मंत्री पद दिले. रामदास कदम यांच्या मुलाला आमदार केले. माँसाहेब मीनाताई ठाकरे यांनी पोटच्या पोरासारखी काळजी घेतली. त्या रामदास कदम यांनी माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवण्याचा प्रयत्न करणे, ही विकृती आहे. रामदास कदम सारखा माणूस शिवरायांचा मावळा किंवा शिवसैनिक तर दूरच परंतु तो कुणाचाही मुलगा किंवा भाऊ म्हणून घेण्याच्या ही लायकीचा असू शकत नाही. अशा माणसाला शिवसेना राज्यात फिरू देणार नाही, असा इशारा शहराध्यक्ष गजानन थरकुडे यांनी दिला.