पुणे : शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Shiv Sena leader Eknath Shinde) यांनी बंड केल्यानंतर राज्यातील राजकारणात दरोरोज विविध घटना घडताना पाहायला मिळत आहे.खरी शिवसेना कोणाची एकनाथ शिंदे यांची की पक्षप्रमुख उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची यावर संघर्ष सुरू असताना; राज्यातील शिवसेनेचे अनेक नेते हे एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी होताना दिसत आहे.अश्यातच पुण्यात देखील शिवसेनेला खिंडार पडले असून शिवसेनेचे नगरसेवक नाना भानगिरे हे एकनाथ शिंदे गटात सहभागी (Shiv Sena corporator Nana Bhangire in Shinde group) झाले आहे.
पश्चिम महाराष्ट्राची जबाबदारी नाना भानगिरे यांच्याकडे असणार असल्याचे सांगितले जात आहे. आतापर्यंत भानगिरे यांनी हडपसर विधानसभा निवडणूक तीन वेळा लढवली आहे. याशिवाय पुणे महानगर पालिकेतून शिवसेनेकडून तीन वेळा नगरसेवक म्हणून निवडुन आले आहेत. मागच्या वेळी शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आलेले पुण्यातील ईतर ५ नगरसेवकही एकनाथ शिंदे यांच्या गटात जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अश्यातच पुण्यात सुरवातीला फक्त राजाभाऊ भिलारे हे एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी झाले होते.
हेही वाचा : Devendra Fadnavis : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात जंगी स्वागत