ETV Bharat / city

Serum Institute special vaccine सिरम इन्स्टिट्यूटची ओमायक्रॉनवरील खास लस या वर्षीच्या अखेर पर्यंत बाजारपेठेत येणार

author img

By

Published : Aug 16, 2022, 9:04 AM IST

पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट सध्या नोवाव्हॅक्ससोबत ओमायक्रॉन Serum Institute special vaccine against Omicron व्हेरियंटवर लस विकसित करण्यासाठी काम करत असून लवकरच भारतात ओमायक्रॉनवर खास लस तयार होणार असल्याची माहिती अदर पुनावाला Adar poonawalla on vaccine against Omicron यांनी दिली आहे.

Serum Institute special vaccine against Omicron
सिरम इन्स्टिट्यूट खास लस अदर पुनावाला प्रतिक्रिया

पुणे पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट सध्या नोवाव्हॅक्ससोबत ओमायक्रॉन Serum Institute special vaccine against Omicron व्हेरियंटवर लस विकसित करण्यासाठी काम करत असून लवकरच भारतात ओमायक्रॉनवर खास लस तयार होणार असल्याची माहिती अदर पुनावाला Adar poonawalla on vaccine against Omicron यांनी दिली आहे. या वर्षाच्या अखेरपर्यंत ही लस भारतीय बाजारात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. ही लस ओमायक्रॉनच्या BA 5 व्हेरियंटवर अधिक उपयुक्त असणार आहे.

हेही वाचा Prakash Surve Provocative Statement हात नाही तोडता आला तर तंगडी तोडा दुसऱ्या दिवशी जामीन करून देतो आमदार प्रकाश सुर्वेंचे प्रक्षोभक वक्तव्य

ओमायक्रॉन आजाराची अनेक लक्षणे तिसर्‍या लाटेत दिसली. ताप, खोकला, घसा खवखवणे, नाक वाहणे, भूक न लागणे, स्नायू कमकुवतपणा, कफ आणि थकवा यासारखी लक्षणे जाणवत होती. जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाचे संकट अद्याप टळलेले नाही. जगातील 50 देशांमध्ये कोरोना पुन्हा एकदा डोके वर काढत आहे. भारतात देखील कोरोना रुग्णांमध्ये थोड्याफार प्रमाणात वाढ होत आहे.

बूस्टर लसीच्या रुपात घेतल्यास प्रभावी ठरेल जगभरात सध्या ओमायक्रॉनच्या BA व्हेरियंटच्या रुग्णसंख्येमध्ये वाढ होत आहे. अमेरिकेमध्ये यासाठी मॉडर्ना लसीच्या वापराला मंजुरी देण्यात आली आहे. ही लस ओमायक्रॉनसोबतच कोरोनाच्या मूळच्या विषाणू विरोधातही प्रभावी आहे. भारतात विकसित होणारी लस ही बूस्टर लसीच्या रुपात घेतल्यास ती प्रभावी ठरेल असे अदर पुनावाला म्हणाले. भारतातील परिस्थीती पाहता ओमायक्रॉन व्हेरियंटविरोधात खास लस तयार करण्याची गरज आहे. हा व्हेरियंट गंभीर स्वरुपाचा असून त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे असे अदर पुनावाला म्हणाले.

ओमायक्रॉन संसर्ग शोधण्याची अचूक पद्धत RT PCR चाचणी आहे. म्हणून जेव्हा जेव्हा तुम्हाला कोणतीही लक्षणे दिसतात तेव्हा शक्य तितक्या लवकर स्वतःची तपासणी करा. ज्या लोकांना सर्दीची लक्षणे दिसतात त्यांना कोरोना चाचणी करून घेण्याचा सल्ला दिला जातो. जेणेकरून संसर्ग वाढ रोखता येईल. याबरोबरच असा सल्लाही देण्यात आला आहे की, जोपर्यंत चाचणीचा अहवाल येत नाही तोपर्यंत तुम्ही स्वतःला आयसोलेशनमध्ये ठेवावे. असे केल्याने तुम्ही कुटुंबातील इतर सदस्यांना संसर्ग होण्यापासून वाचवू शकता.

हेही वाचा AC Local in Central Railway मध्य रेल्वेमध्ये अतिरिक्त दहा एसी लोकल वाढवल्या जाणार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.