ETV Bharat / city

Omicron Second Patient In Pune : पुण्यात आढळला ओमायक्रॉनचा दुसरा रुग्ण - Pune Health Department

दुबईहून पुण्यात (Dubai To Pune) आलेल्या एका महिलेचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला असून, तिला ओमायक्रॉनची लागण झाली असल्याचे (Pune Woman Found Omicron Positive) समोर आले आहे. ओमायक्रॉन व्हॅरिएंट आढळून आलेला हा पुण्यातील दुसरा रुग्ण (Omicron Second Patient In Pune) आहे. या महिलेच्या संपर्कात आलेल्यांची कोरोना चाचणी (Covid 19 Test) करण्यात आली असून, त्यांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

Omicron
Omicron
author img

By

Published : Dec 14, 2021, 9:42 AM IST

पुणे - दक्षिण आफ्रिकेमध्ये (South Africa) आढळलेल्या कोरोना विषाणूच्या ओमायक्रॉन व्हेरियंटने (Omicron Variant Of Covid 19) राज्यात ही प्रवेश केला (Omicron In Maharashtra) आहे. पुणे शहरात प्रथम आढळून आलेल्या ओमायक्रॉन बाधित रुग्णाची रिपोर्ट निगेटिव्ह (First Omicron Patient In Pune Found Negative) आल्या नंतर पुणे शहरात ओमायक्रॉनचा दुसरा रुग्ण आढळून आला (Omicron Second Patient In Pune) आहे. त्यानंतर आता प्रशासन अधिक सतर्क झाले आहे.

रुग्णाला कोणतीही लक्षणे नसून, तिचे लसीकरण पूर्ण
राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने (National Institute of Virology) दिलेल्या अहवालानुसार, पुण्यामध्ये कोरोना विषाणूच्या ओमायक्रॉन व्हॅरिएंटचा आणखी एक रुग्ण आढळून आला आहे. पुण्यातील ३९ वर्षीय महिलेला ओमायक्रॉनची लागण झाली असून, ही महिला दुबईहून पुण्यात दाखल झाल्याचे आरोग्य विभागाकडून (Pune Health Department) सांगण्यात आले आहे. महिलेला सध्या कोणतीही लक्षणे नसून, तिचे लसीकरण पूर्ण झाले आहे. महिलेला सध्या विलगीकरणात ठेवण्यात आले आहे.ओमायक्रॉनबाधित महिलेच्या संपर्कातील तीन जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. तिघांचेही अहवाल निगेटिव्ह आले आहेत. पुण्यातील ओमायक्रॉनबाधित रुग्णांची संख्या आता २ झाली आहे.

राज्यात बाधित रुग्णांची संख्या 20 वर
आता राज्यातील एकूण ओमायक्रॉन विषाणू बाधित रुग्णांची संख्या २० वर पोहचली आहे. यात मुंबईत ५, पिंपरी चिंचवडमध्ये १०, पुणे मनपा क्षेत्रात २, कल्याण डोंबिवलीत १, नागपूरमध्ये १ आणि लातूरमध्ये १ रूग्ण आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.