ETV Bharat / city

Ajit Pawar On School Reopening : 1 फेब्रुवारीपासून पुण्यातील शाळा, महाविद्यालये सुरु

author img

By

Published : Jan 29, 2022, 10:37 AM IST

Updated : Jan 29, 2022, 2:29 PM IST

राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत ( Maharashtra Corona Cases Decreased ) आहे. त्याच पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील शाळा आणि कॉलेज 1 फेब्रुवारीपासून सुरु होणार, असल्याची माहिती अजित पवार यांनी ( Pune School And Colleges Reopen ) दिली.

Ajit Pawar
Ajit Pawar

पुणे - राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत ( Maharashtra Corona Cases Decreased ) आहे. त्याच पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील शाळा आणि महाविद्यालये 1 फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे. शाळा सुरु करण्यात येत असली तरी, मुलांना शाळेत पाठवण्याबाबात पालकांनी निर्णय घ्यायचा असल्याची माहिती उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी ( Pune School And Colleges Reopen ) दिली.

पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना अजित पवार म्हणाले की, "पुणे जिल्ह्यातील शाळा आणि महाविद्यालय 1 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. पहिले ते आठवीचे वर्ग हे 4 तासाचं सुरु राहतील. तर, 9 वी नंतरचे वर्ग पुर्णवेळ सुरु होणार आहेत. मुलांना शाळेत पाठवायचे का नाही याबाबतचा निर्णय पालकांना घ्यायचा आहे. तसेच, मुलांचे लसीकरण अधिकाधिक होण्यासाठी मोबाईल व्हॅनद्वारे लसीकरण करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली."

त्याबाबत सभापती, उपसभापती ठरवतील

12 आमदारांचे निलंबन सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्याबाबत अजित पवारांना विचारले असता त्यांनी सांगितले ( Ajit Pawar On Bjp Mla Suspension ) की, "विधिमंडळाने 12 आमदारांचा निर्णय घेतला आहे. त्याचा जो काही निकाल आला आहे. त्यासंदर्भात कायदेतज्ज्ञाशी चर्चा करुन सभापती, उपसभापती निर्णय घेतील. न्यायव्यवस्थेने घेतलेल्या निर्णयावर बोलायचे नसते,"असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

अजित पवार प्रसारमाध्यमांशी बोलताना

एसटी कर्मचाऱ्यांना आग्रहाची विनंती

एसटी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत मंत्री अनिल परब यांनी भूमिका जाहीर केली आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारासंदर्भात निर्णय झाला आहे. विलनीकरणाबाबात कोर्ट निर्णय घेणार आहे. कर्मचाऱ्यांना आग्रहाची विनंती आहे की, त्यांनी कामावर रुजू व्हावे. कामगारांनी टोकाची भूमिका न घेता समंतस्यपणे घ्यावे आणि गोरगरिब प्रवाशांचा विचार करावा, असेही पवार यांनी सांगितले.

वाईन आणि दारू यात फरक आहे

वाईनसंदर्भात बोलताना अजित पवार म्हणाले की, सुपर मार्केट मध्ये किंवा स्टोर मध्ये सोप्या पद्धतीने वाईनची विक्री ही संकल्पना राबवण्याचा सरकारने निर्णय घेतला. या निर्णयाविरोधात विरोधी पक्ष सरकारवर टीका करत आहे. पण वाईन आणि दारू यात फरक आहे. उगाच गैरसमज केला जातोय अनेक गोष्टींतून वाईन तयार केली जाते. ते पिण्याचे प्रमाण आपल्याकडे कमी आहे. आम्ही सरकारमध्ये असताना लोकांच्या हितासाठी काही करू शकतो का याचा प्रयत्न करत असतो. पण काही लोक व्हिडिओ काढून सरकार विरोधात जाणीवपूर्वक प्रचार करत आहेत, असेही त्यांनी म्हटलं.

हेही वाचा - Maharashtra Police Recruitment : तरुणांनो लागा तयारीला, राज्यात 7200 नवी पदे भरली जाणार, गृहमंत्र्यांची घोषणा

Last Updated : Jan 29, 2022, 2:29 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.