ETV Bharat / city

Sawali App for Women Security : महिलांच्या सुरक्षेसाठी आता 'सावली' अ‍ॅप; जाणून घ्या काय आहे 'हे' अ‍ॅप

author img

By

Published : Jan 29, 2022, 8:01 PM IST

देशात महिलांच्या अत्याचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना पाहायला मिळत आहे. किडनॅपिंग रेप केसेस स्त्रीभ्रूण हत्या यांसारख्या घटना आज-काल नेहमीच आपण ऐकत असतो वाचत असतो. यावर उपाय म्हणून अनेकांनी अनेक उपाययोजना केल्या. पण महिल्यांच्या अत्याचाराच्या घटनांमध्ये काही घट होताना दिसत नाहीये. उलट या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. मॉडन टेक्नॉलॉजीचा वापर करून तसेच त्यातून महिलांना तात्काळ कशी मदत होईल हा विचार करून पुण्यातील बी टेकच्या धनंजय राशीनकर या विद्यार्थ्याने एक सावली नावाची अ‍ॅप ( Sawali App for Women Security ) तयार केली आहे.

Sawali App for Women Security
महिलांच्या सुरक्षेसाठी आता 'सावली' अ‍ॅप

पुणे - देशात महिलांच्या अत्याचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना पाहायला मिळत आहे. किडनॅपिंग रेप केसेस स्त्रीभ्रूण हत्या यांसारख्या घटना आज-काल नेहमीच आपण ऐकत असतो वाचत असतो. यावर उपाय म्हणून अनेकांनी अनेक उपाययोजना केल्या. पण महिल्यांच्या अत्याचाराच्या घटनांमध्ये काही घट होताना दिसत नाहीये. उलट या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. मॉडन टेक्नॉलॉजीचा वापर करून तसेच त्यातून महिलांना तात्काळ कशी मदत होईल हा विचार करून पुण्यातील बी टेकच्या धनंजय राशीनकर या विद्यार्थ्याने ( b tech student made app for Women Security ) एक सावली नावाची अ‍ॅप ( Sawali App for Women Security ) तयार केली आहे. कठीण अडचणीच्या किंवा आणीबाणीच्या काळात मुली किंवा महिला या सावली अ‍ॅपद्वारे मोबाईलच्या ( Sawali Mobile App ) नोटिफिकेशनद्वारे फक्त एका क्लिकवर त्यानी सेव्ह केलेल्या नंबरवर हेल्प हेल्प असा मॅसेज जाईल आणि लाईव्ह लोकेशन देखील जाणार आहे. अश्या पद्धतीने या अ‍ॅपचा फायदा होणार आहे.

महिलांच्या सुरक्षेसाठी 'सावली' अ‍ॅप
  • सत्यमेव जयते पासून घेतली प्रेरणा -

पुण्यातील विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ( Vishwakarma Institute of Information Technology ) या कॉलेजच्या धनंजय राशिनकर या विद्यार्थ्याने महिलांच्या सुरक्षितेसाठी अभिषेक देसाई दिग्विजय पवार वैभव साहू साक्षी कांगणे अशा फस्ट इयरच्या विद्यार्थ्यांची मदत घेत सावली अ‍ॅप बनविली आहे. लॉकडाऊनच्या काळात अभिनेते आमिर खान यांचे सत्यमेव जयते पाहून महिलांविषयी काहीतरी करता येऊ शकतो का विचार आला आणि त्यांनंतर ही अ‍ॅप बनवायला सुरुवात केली. अ‍ॅप बनवायला धनंजय आणि त्याच्या मित्रांना एक ते दीड महिन्याचा काळ लागला असून आता ही अ‍ॅप प्ले स्टोरवर उपलब्ध आहे.

  • काय आहे वेगळेपणा -

या अ‍ॅपच्या वेगळेपण म्हणजे या अ‍ॅपमध्ये आपण आपल्या ओळखीच्या लोकांचे नंबर सेव्ह करून ठेवू शकतो. आणि त्यानंतर आपल्या मोबाईलवर नोटिफिकेशन सुरूच असतो. जेव्हा वाटले की काहीतरी गडबड आहे. तेव्हा फक्त नोटिफिकेशन पिनवर फक्त एक क्लिक करायचे आणि त्यांनतर लगेच जे नंबर आहेत. त्या नंबरवर हेल्प हेल्प म्हणून एक मॅसेज जाईल आणि सोबत लाईव्ह लोकेशन देखील जाणार आहे. आणि त्यामुळे लवकर मदत मिळू शकते. दुसऱ्या अ‍ॅप सारखे ओपन करायची बिलकुल देखील गरज लागणार नाही. हे अ‍ॅप युनिक असल्यामुळे या अ‍ॅपचे पेटंट देखील ग्रँट झाले आहे.

  • अ‍ॅप बनविण्यासाठी काहीही खर्च नाही -

धनंजय आणि त्याच्या टीमने हे ॲप स्वतः बनविले असल्यामुळे त्यांना काही खर्च लागला नाही फक्त प्ले स्टोअर वर टाकण्यासाठी दोन हजार रुपये चार्जेस लागले आणि पेटंट फाईल करण्यासाठी 45 हजार रुपये खर्च आला आहे. ही अ‍ॅप बनवत असताना आम्ही अनेक नवीन टेक्नॉलॉजीचा वापर केला आहे. सगळ्यात महत्त्वाचं होतं की नोटिफिकेशन तीन ठेवायचं आणि एस एम एस द्वारे लाईव्ह लोकेशन सेंड करायचे त्यात आम्हाला यश मिळाल्याचे धनंजयनी यावेळी सांगितले.

हेही वाचा - Chikhaldara Skywalk : भारतातील पहिला स्कायवॉक अमरावतीच्या चिखलदऱ्यात; बांधकामाला केंद्राची परवानगी मिळाल्याने पर्यटकांमध्ये आनंद

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.