ETV Bharat / city

Savitribai Phule Birth Anniversary :'...म्हणून भिडे वाड्याची स्थिती दयनीय', सावित्रीबाईंच्या वशंजांनी व्यक्त केली खंत

१ जानेवारी १८४८ या नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी महात्मा फुले यांनी मुलींची पहिली शाळा पुण्यातील भिडे यांच्या ( First Girl School Start In Bhide Wada ) वाड्यात सुरू केली होती. मात्र, स्त्री शिक्षणाच्या क्रांतीची बीजे पेरणाऱ्या आणि फुले दांपत्याच्या कार्याचा वारसा सांगणाऱ्या या शाळेची आज 172 वर्षांनंतरची ( Bhide Wada Condition ) अवस्था मात्र अत्यंत दयनीय झाली आहे. यासंदर्भात सावित्रीबाईंच्या वंशज नीता होले ( Savitribai Fule Descendants ) फुले यांच्याशी 'ईटीव्ही भारत'ने बातचीत केली आहे.

Savitribai Fule Descendants
Savitribai Fule Descendants
author img

By

Published : Jan 3, 2022, 5:30 PM IST

Updated : Jan 3, 2022, 5:56 PM IST

पुणे - देशात मुलींची पहिली शाळा कोणी ( Who Start First Girl School In India ) सुरू केली? असा प्रश्न विचारला, तर आपल्या डोळ्यापुढे महात्मा फुले ( Mahatma Jyotiba Phule ) यांचे नाव येतं. पण कुठे सुरू केली, असं विचारलं तर कुठल्या तरी, वाड्यात सुरू ( Pune Bhide Wada ) केली होती, असं उत्तर ऐकायला मिळतं. आणखी पुढे जाऊन त्यांनी ती कोणत्या वर्षी असे विचारले तर आपल्यापैकी बहुतेकांना ते सांगता येत नाही. १ जानेवारी १८४८ या नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी महात्मा फुले यांनी मुलींची पहिली शाळा पुण्यातील भिडे यांच्या ( First Girl School Start In Bhide Wada ) वाड्यात सुरू केली होती. मात्र, स्त्री शिक्षणाच्या क्रांतीची बीजे पेरणाऱ्या आणि फुले दांपत्याच्या कार्याचा वारसा सांगणाऱ्या या शाळेची आज 172 वर्षांनंतरची ( Bhide Wada Condition ) अवस्था मात्र अत्यंत दयनीय झाली आहे. यासंदर्भात सावित्रीबाईंच्या वंशज नीता होले फुले ( Savitribai Fule Descendants ) यांच्याशी 'ईटीव्ही भारत'ने बातचीत केली आहे.

प्रतिक्रिया

'...म्हणून या वाड्याची अशी स्थिती' -

सावित्रीबाई आपल्या देशात जन्माला आल्या त्याचा मला प्रचंड आनंद होतो. मात्र, ज्या शाळेतून स्त्री शिक्षणाची बीजं रोवल्या गेली, त्या जागेची अशी दयनीय अवस्था बघून दुखंही होतं. सावित्रीबाईंनी ज्या जिद्दीने महिलांना शिक्षण दिले, त्यासाठी जो संघर्ष त्यांनी केला, तसा संघर्ष करण्यात आम्ही अयशस्वी झालो. त्यामुळे या वाड्याची अशी स्थिती आहे. याची आम्हाला खंत देखील वाटते, अशी प्रतिक्रिया सावित्रीबाईंच्या वंशज नीता होले फुले यांनी दिली आहे.

भिडे वाड्याची सद्यस्थिती अत्यंत दयनीय -

पुण्यातील भिडे वाड्याची सद्यस्थिती अत्यंत दयनीय आहे. अंधाऱ्या खोल्या, पडलेल्याला भिंती, कोलमडून पडलेले लाकडी खांब, जमलेली धूळ, जाळे-जळमटं यांनी व्यापलेला अंतर्गत परिसर, अशी काहीशी परिस्थिती या वाड्याची आहे. आत जाण्यासाठी पटकन लक्षात येईल, असा रस्ताही येथे नाही. विद्येचं माहेरघर असणाऱ्या पुण्यात मुलींना शिक्षणाची दारं खुली करणाऱ्या भिडेवाड्याची ही अशी दुरावस्था नक्कीच लाजिरवाणी आहे. आजपर्यंत याकडे शासन, प्रशासनाचं तर दुर्लक्ष झालचं आहे.

स्त्री-शिक्षणासाठी झेलले दगड धोंडे -

पुण्यातील भिडे वाड्यात जेंव्हा ही शाळा सुरू झाली. तेंव्हा सावित्रीबाई यांचे वय केवळ 18 वर्षे होते. 1848च्या सुरुवातीला या शाळेत केवळ 6 मुली होत्या. पण, वर्ष संपेपर्यंत ही संख्या 40 मुलींपर्यंत जाऊन पोहचली. अनेक संघर्ष करत हा सावित्रीबाईंचा शिक्षणप्रसाराचा उपक्रम सुरुच राहिला. यादरम्यान, त्यांनी शेण-माती अंगावर झेलली, दगड धोंडे अंगावर घेतले, जखमी झाल्या, कर्मठ समाजाचा अत्याचार सहन केला. मात्र, मुलींना शिकवण्याची त्यांची जिद्द आणि आत्मविश्वास कुठेही कमी झाला नाही.

हेही वाचा - Pune University Agitation : पुणे विद्यापीठात गोंधळ! सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्याचा प्रयत्न

Last Updated : Jan 3, 2022, 5:56 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.