ETV Bharat / city

Salman Khan Threat Letter : सौरभ महाकालने सलमान खान धमकी पत्राबाबत चौकशीत दिली 'ही' माहिती - सौरभ महाकाल पोलीस चौकशी

सौरभ महाकाल ( Saurabh Mahakal ) उर्फ सिद्धेश हिरामण कांबळे याच्याकडे काल ( गुरुवारी ) मुंबई क्राईम ब्रँचने ( Mumbai Crime Branch ) चौकशी केली असता अनेक धक्कादायक खुलासे महाकाल याने केले आहे. बिष्णोईचा सहकारी विक्रम बरारने ( Vikram Barar ) तीन लोकांच्या माध्यमातून हे पत्र सलीम खान ( Salim Khan threat letter ) यांच्यापर्यंत पोहचवले. सलमान खानला दिलेल्या धमकीनंतर बॉलिवूडमधील बड्या कलाकारांकडून खंडणी वसूल करता येईल, असे महाकालने पोलिसांनी केलेल्या चौकशीत कबुली दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

सौरभ महाकाल
सौरभ महाकाल
author img

By

Published : Jun 10, 2022, 3:12 PM IST

पुणे - पुणे पोलिसांनी अटक केलेल्या सौरभ महाकाल ( Saurabh Mahakal ) उर्फ सिद्धेश हिरामण कांबळे याच्याकडे काल ( गुरुवारी ) मुंबई क्राईम ब्रँचने ( Mumbai Crime Branch ) चौकशी केली असता अनेक धक्कादायक खुलासे महाकाल याने केले आहे. बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि त्याचे वडील सलीम खान यांना जीवे मारण्याच्या धमकीचे पत्र आले होते. त्यासंदर्भात ही चौकशी करण्यात आली. सलमान खान यांनी मला अशी धमकीच आली नाही, असे जरी जबाबात सांगितले असले तरी या चौकशीत सौरव महाकाल याने अनेक धक्कादायक खुलासे केले असल्याची माहिती आता समोर आली आहे. बिष्णोईचा सहकारी विक्रम बरारने ( Vikram Barar ) तीन लोकांच्या माध्यमातून हे पत्र सलीम खान ( Salim Khan threat letter ) यांच्यापर्यंत पोहचवले. सलमान खानला दिलेल्या धमकीनंतर बॉलिवूडमधील बड्या कलाकारांकडून खंडणी वसूल करता येईल, असे महाकालने पोलिसांनी केलेल्या चौकशीत कबुली दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

'ते' तीन जण कोण ? : तुरुंगामध्ये असणाऱ्या लॉरेन्स बिष्णोईने हे पत्र सलमान खान आणि त्याचे वडील सलीम खान यांच्या नावे पाठवले होते. राजस्थानमधील जलोरी येथून बिष्णोई टोळीचे तीन जण मुंबईमध्ये आले होते. त्यांनीच हे पत्र सलीम खान यांच्यापर्यंत पोहचवले. तसेच त्यांनी सौरभ महाकालचीही यावेळी भेट घेतली, असे पोलिसांनी केलेल्या चौकशीदरम्यान समोर आले आहे. तसेच हे पत्र सलीम खान यांच्यापर्यंत पोहचवण्याचे काम करणाऱ्या तीन जण कोण आहेत? याबद्दलची माहिती गुन्हे शाखेच्या हाती लागली असून या लोकांची ओळख पटल्यानंतर त्यांना पकडण्यासाठी देशाच्या वेगवगेळ्या भागांमध्ये सहा तुकड्या पाठवण्यात आले असल्याची प्राथमिक माहिती आहे.

कोण आहेत विक्रम बरार? : विक्रम बरार हा बिष्णोईचा सहकारी असून त्याच्यावर एक डझनहून अधिक गुन्ह्यांची नोंद आहे. तो सध्या कॅनडामध्ये वास्तव्यास आहे. विक्रमजीत सिंह बरार असे त्याचं संपूर्ण नाव आहे. एकेकाळी विक्रम हा राजस्थानमधील कुप्रसिद्ध गँगस्टर आनंदपालचा सहकारी होती. मात्र आनंदपालला पोलिसांनी ठार केल्यानंतर तो बिष्णोई टोळीत सहभागी झाला. बिष्णोई टोळीने मुसेवालांची हत्या केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. मुसेवाला खून प्रकरणात संतोष जाधव आणि सौरभ महाकाळ संशयित आरोपी आहेत. बिष्णोई टोळीने अभिनेता सलमान खानला जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्याअनुषंगाने मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाने गुरुवारी महाकाळची चौकशी केली.

हेही वाचा - Actor Salman Khan Threaten Case : अभिनेता सलमान खानला धमकी; मुंबई पोलिसांना पटली आरोपीची ओळख

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.