ETV Bharat / city

सत्ता असतानाही स्वतःचा मतदारसंघ सांभाळू शकला नाहीत; खासदार काकडेंची पंकजा मुंडेंवर टीका - mp sanjay kakde news

पाच वर्षे सत्ता असतानाही स्वतःचा मतदार संघ सांभाळू शकला नाही, आता राज्यभर दौरे काढून काय दिवे लावणार; अशी टीका भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी पंकजा मुंडेंवर केली आहे.

sanjay kakade criticised pankaja munde
भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे
author img

By

Published : Dec 13, 2019, 2:36 PM IST

Updated : Dec 13, 2019, 2:52 PM IST

पुणे - पाच वर्षे सत्ता असतानाही स्वतःचा मतदारसंघ सांभाळू शकला नाहीत, आता राज्यभर दौरे काढून काय दिवे लावणार; अशी टीका भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी पंकजा मुंडेंवर केली आहे. पाच वर्षे मंत्री आणि चाळीस वर्षे राजकारणात असताना मूठभर मतदारसंघ सांभाळता आला नाही, असे ते म्हणाले. तसेच जी व्यक्ती 30 हजार मतांच्या फरकाने पराभूत होते, अशा व्यक्तींच्या वक्तव्याने पक्षाला कोणताही फरक पडत नसल्याचे काकडे यांनी सांगितले.

भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे

पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ मुंडेंच्या स्मृतीदिनी केलेल्या भाषणात भाजपच्या राज्य नेतृत्वावर टीका केली होती. त्याला प्रत्युत्तर देताना पंकजा मुंडे यांनी कोणालाच जवळ केले नसल्याचे ते म्हणाले. तसेच मराठा, मुस्लीम व ओबीसी समाज मुंडेंवर नाराज असल्यानेच त्यांचा पराभव झाला असून त्यांनी याचे खापर पक्षश्रेष्ठींवर फोडू नये, असे काकडे यांनी सुनावले. गोपीनाथ गडावरील मेळाव्याला गांभीर्याने घेण्याची गरज नसल्याचेही त्यांनी सांगितले.

पाच वर्षात त्यांनी कोणाकडेही लक्ष दिले नाही; त्याचं रुपांतर पराभवात झालं. पंकजा यांनी पाच वर्षात कार्यकर्ते, नेते यांना कधीच जवळ केले नाही, असे ते म्हणाले.

आपल्या चुकांचे खापर दुसऱ्यावर फोडायचे, आणि दबावतंत्र निर्माण करून पदरात काही पाडून घ्यायचे, हे त्या आधीपासून करत असल्याचा आरोप यावेळी खासदार काकडे यांनी केला आहे.

Intro:पाच वर्षे सत्ता असतानाही स्वतःचा मतदार संघ सांभाळू शकला नाहीत, आता राज्यभर दौरे काढून काय दिवे लावणार; भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांची पंकजा मुंडेंवर टीका...

पाच वर्षे मंत्री असताना, चाळीस वर्षं राजकारणात असताना ज्यांना मूठभर मतदारसंघ सांभाळता आला नाही, जी व्यक्ती ३० हजारांच्या मताधिक्याने पराभूत होते, त्यांच्यामुळे पक्षाला काहीही फरक पडणार नाही. आता राज्यभर दौरे काढून काय दिवे लावणार आहात अशा शब्दात भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांची पंकजा मुंडेंवर टीका केेली.

काकडे म्हणाले, पंकजा मुंडे यांंनी कोणालाच जवळ केले नाही. मराठा समाज, मुस्लिम समाज, ओबीसी समाज नाराज होता. पंकजा मुंडे यांनी पक्षाने माझ्याबद्दल निर्णय घ्यावा या वक्तव्याचा मी निषेध करतो. तसेच कालच्या मेळाव्याला फारश्या गांभीर्याने घेण्याची गरज नाही.

पाच वर्षात त्यांनी कुणाकडेच लक्ष दिले नाही.. त्याचं रूपांतर पराभवात झालं आणि त्याचं खापर दुसऱ्या कुणावर फोडणं हे योग्य नाही. आपला मतदारसंघ मजबूत असेल आपली जनतेशी नाळ असेल तर पराभव होणारच नाही.. गोपीनाथ मुंढेची नाळ ही सर्वसामान्य लोकांशी जुळलेली होती..त्यामुळे ते वारंवार निवडून येत होती..पंकजा यांनी पाच वर्षात कार्यकर्ते, नेते यांना कधीच जवळ केले नाही. यामुळे त्यांचा पराभव झाला. आपल्या चुकांचे खापर दुसऱ्यावर फोडायचे, आणि दबावतंत्र निर्माण करून पदरात काही पाडून घ्यावचे हे त्या आधीपासून करत आहेत. Body:।Conclusion:।
Last Updated : Dec 13, 2019, 2:52 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.