पुणे - पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भाजपकडून संग्राम देशमुख यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी भाजपकडून जोरदार शक्तिप्रर्दशन करण्यात आले.
पुणे पदवीधर मतदारसंघासाठी उमेदवार म्हणून पक्षाने मला संधी दिली. ही मी माझ्यावर सोपवलेली सर्वात मोठी जबाबदारी समजतो. मी पदवीधरांचे प्रश्न सोडवण्यासाठी कायम प्रयत्न करेन,अशी प्रतिक्रिया यावेळी देशमुख यांनी दिली. उमेदवारी अर्ज दाखल करतांना भाजपकडून जोरदार शक्तिप्रर्दशन करण्यात आले. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, खासदार गिरीश बापट, भाजप नेते हर्षवर्धन पाटील, रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
हेही वाचा - कर्जाचे हप्ते भरण्यासाठी फायनान्स कंपन्यांनी 31 मार्चपर्यंत मुदत द्यावी - मनसे वाहतूक सेना
हेही वाचा - बिहार निवडणूक नव्या पिढीला प्रेरणा देणारी; तेजस्वीने चांगली लढत दिली