पुणे - भाजपा नेते आणि आमदार गणेश नाईक ( BJP MLA Ganesh Naik ) यांच्यावर एका महिलेसोबत तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध प्रस्थापित केल्यानंतर झालेल्या अपत्याचा स्विकार न करणे आणि त्या पीडित महिलेला त्रास दिल्याबद्दल गुन्हा दाखल ( Case File Against BJP MLA Ganesh Naik ) करण्यात आला आहे. गणेश नाईक यांना आता याप्रकरणी तत्काळ अटक करण्याची कारवाई देखील लवकरच केली जाईल, अशी माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर ( State Women Commission Chairperson Rupali Chakankar ) यांनी दिली आहे.
काही दिवसापूर्वी पीडित महिलेने राज्य महिला आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. त्याप्रकरणी आयोगाने नवी मुंबई पोलिसांना यावर योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. यानंतर पोलिसांनी आज (रविवारी) गणेश नाईक यांच्याविरुद्ध जीवे मारण्याची धमकी देणे व इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवणे हे गुन्हे दाखल केले आहेत. गणेश नाईक यांना आता याप्रकरणी तत्काळ अटक करण्याची कार्यवाही देखील लवकरच केली जाईल, अशी माहिती रुपाली चाकणकर यांनी दिली आहे.
काय आहे प्रकरण? : नवी मुंबईतील एका महिलेने काही दिवसांपूर्वी आमदार गणेश नाईक यांच्याविरोधात लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. गणेश नाईक यांनी १९९३ पासून लैंगिक शोषण करत असल्याचा आरोप संबंधित महिलेने केला होता. तसेच आपल्याला या संबंधातून पंधरा वर्षाचा मुलगा असल्याचे देखील महिलेने सांगितले होते. या सगळ्या बाबत संबंधित महिलेने रितसर तक्रार देखील पोलिसांकडे केली होती. परंतु पोलिसांनी तक्रार देऊनही कारवाई केली नसल्याने संबंधित महिलेने महिला आयोगाकडे न्यायासाठी धाव घेतली. आता राज्य महिला आयोगाने याप्रकरणी दखल घेत आमदार गणेश नाईक यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे आता भाजपा नेते आणि आमदार गणेश नाईक यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा - Case File Against BJP MLA Ganesh Naik : भाजप आमदार गणेश नाईक यांच्याविरोध अत्याचाराचा गुन्हा दाखल