पुणे - सध्या सर्वत्र 'द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाची चर्चा आहे. दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी काश्मीरच्या इतिहासातील एक वेगळी बाजू मांडण्याचा प्रयत्न या चित्रपटातून केला आहे. दरम्यान या चित्रपटावर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने (खरात गट) टीका केली आहे. चित्रपटातील इतिहास खोटा आहे, अशी टीका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने केली आहे.
हेही वाचा - Pune Traffic Police Action : पुणे वाहतूक पोलिसांनी सामनासह दुचाकी उचलली; व्हिडिओ होतोय व्हायरल
१९९० चा इतिहास मांडण्याचा प्रयत्न
१९९० साली काश्मीरमध्ये जे घडले ते सारे या चित्रपटात दाखवण्यात आले आहे. याच काळात अनेक काश्मिरी पंडित आपली घरे सोडून गेले ज्यांना एक्झोडस असे संबोधले जाते. पण हे काश्मिरी पंडित निघून गेले नाहीत तरस यांना मारण्यात आले, असा दावा या चित्रपटात करण्यात अला आहे.
तगडी स्टार कास्ट
विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित या चित्रपटात तगडी स्टार कास्ट देखील पाहायला मिळत आहे. मिथून चक्रवर्ती, अनुपम खेर, पल्लवी जोशीच्या जोडीला दर्शन कुमार, चिन्मय मंडलेकर आणि मृणाल कुलकर्णीने या चित्रपटात काम केले आहे. काश्मिरी स्त्रीची व्यथा, हतबलता, आर्तपणे संपूर्ण चित्रपटभर दाखवली आहे.
चित्रपटाला कुठे पाठिंबा तर कुठे विरोध
'द काश्मीर फाइल्स’ चे शो सध्या हाऊसफुल्ल होताना दिसत आहेत. अनेक समज माध्यमातून या चित्रपटाचे मोठ कौतुक होताना पाहायला मिळत आहे. अनेक नेत्यांनी आणि केंद्रीय मंत्र्यांनी सुद्धा हा चित्रपट पाहण्याचे आवाहन केले आहे.
चित्रपटात दाखवलेला इतिहास खोटा: रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया
दुसरीकडे या चित्रपटाला विरोध देखील होताना पाहायला मिळत आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरात यांनी या चित्रपटात दाखवलेला इतिहास खोटा असल्याचा आरोप केला आहे. उगाच काश्मीर फाईल चित्रपट पाहण्याचे आवाहन करू नका, असे सांगत त्यांनी तुमची मातृसंस्था राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने कधीही भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला नाही, अशी टीका देखील त्यांनी केली आहे. तसेच, तुम्ही वर्षानुवर्षे तिरंगा झेंडा संघ कार्यालयावर लावला नाही. चुकीचा इतिहास असणारा काश्मिरी फाईल चित्रपट लोकांनी पाहावा, असे आवाहन करत आहेत. तुम्हाला हिंदू, दलित, बहुजन बद्दल प्रेम नाही. हे फक्त एका जातीचे पुरस्कर्ते आहेत, असे देखील सचिन खरात यांनी सांगितले.
हेही वाचा - 'या तरुणीची पूजा चव्हाण होऊ देऊ नका'; चित्रा वाघ यांचे शिवसेना नेते रघुनाथ कुचिक यांच्यावर आरोप