पुणे - पुण्यातील भारती विद्यापीठ परिसरात धक्कादायक घटना समोर आली आहे. मैत्रिणीला फ्लॅटवर नेऊन ज्युसमधून गुंगीचे औषध देऊन तिला गुंगी आल्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यानंतर लग्नाचे आमिष दाखवून वारंवार शरीरसंबंध ठेवल्याचा प्रकार घडला आहे.
कॉलेज कॅम्प्समधील इमारतीत घडला प्रकार -
या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी अक्षय कदम (रा. आंबेगाव बुद्रुक) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत एका २८ वर्षाच्या तरुणीने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना ३१ जुलै ते २८ ऑगस्ट २०२१ दरम्यान एका कॉलेज कॅम्प्समधील इमारतीत घडली आहे.
हे ही वाचा -सैतानाचा अवतार म्हणत महिलेचा अमानुष छळ.. अनैसर्गिक कृत्य करण्यास पाडले भाग, बारामतीतील प्रकार
अत्याचार करण्याअगोदर दाखवायचा पॉर्न व्हिडिओ -
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 31 जुलै रोजी अक्षय कदम याने फिर्यादी तरुणीला त्याच्या फ्लॅटवर नेले. याठिकाणी आरोपीने पीडितेला गुंगीचे औषध टाकलेले ज्यूस प्यायला दिले होते. ज्यूस प्यायल्यानंतर काही वेळातच पीडित तरुणीला गुंगी आली. यानंतर आरोपीने मैत्रीच्या नात्याला कलंक फासत पीडित तरुणीवर बलात्कार केला.
लग्नाचे आमिष दाखवून वारंवार अत्याचार -
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पीडित तरुणीने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी बलात्कारासह ब्लॅकमेलिंगच्या कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास भारती विद्यापीठ पोलीस करत आहेत. आरोपीने लग्नाचे आमिष दाखवून वारंवार बलात्कार केल्याची व अत्याचार करण्यापूर्वी पॉर्न व्हिडिओ दाखवत असल्याची तक्रार पिडितेने केली आहे.