ETV Bharat / city

Rampath Yatra special train पुणे रेल्वे स्टेशन येथून अयोध्येला रामपथ स्पेशल रेल्वे रवाना - Rampath Yatra special train booking service

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनानुसार देशातील पर्यटनाला चालना देण्यासाठी ‘देखो अपना देश’ ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. रामपथ यात्रा ट्रेन ही रामायण सर्किटचा भाग आहे. रामपथ स्पेशल रेल्वे ही पुणे-नाशिक-जळगाव -भुसावळ -खांडवा -इटारसी -माणिकपूर -बनारस व अयोध्या अशा मार्गाने ( Rampath special train route ) ही रेल्वे जाणार आहे.

रामपथ स्पेशल रेल्वे
रामपथ स्पेशल रेल्वे
author img

By

Published : Nov 27, 2021, 3:20 PM IST

Updated : Nov 27, 2021, 3:57 PM IST

पुणे - अयोध्येला जाणाऱ्या रामभक्तांसाठी अयोध्या आणि पुणे ही दोन शहरे खास रेल्वेने जोडण्यात येणार आहे. त्यासाठी पुणे रेल्वे स्टेशन येथून अयोध्येला रामपथ स्पेशल रेल्वे ( Rampath Yatra special train ) सुरू करण्यात आली आहे. रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे ( Minister of State in the Ministry of Railways flagged new rail ) यांच्या हस्ते ऑनलाईन हिरवा कंदील दाखवून ही रेल्वे रवाना झाली आहे.

पुणे रेल्वे स्टेशन येथून निघालेली रामपथ स्पेशल रेल्वे ( Rampath Yatra special train from Pune ) रेल्वे 28 तारखेला 5 वाजता अयोध्येला पोहोचणार आहे. रामपथ स्पेशल रेल्वे ही पुणे-नाशिक-जळगाव -भुसावळ -खांडवा -इटारसी -माणिकपूर -बनारस व अयोध्या अशा मार्गाने ( Rampath special train route ) ही रेल्वे जाणार आहे.

अयोध्येला रामपथ स्पेशल रेल्वे रवाना
देखो अपना देश ही मोहीम सुरू

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनानुसार देशातील पर्यटनाला चालना देण्यासाठी ‘देखो अपना देश’ ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. रामपथ यात्रा ट्रेन ही रामायण सर्किटचा भाग आहे. प्रभू रामाच्या प्रवासातील महत्त्वाच्या ठिकाणांना जोडते. रामपथ यात्रा पॅकेजमध्ये भाविकांसाठी तिकीट, निवास, भोजन, वाहतूक, पर्यटक मार्गदर्शक इत्यादी सर्व व्यवस्था केल्याबद्दल त्यांनी रेल्वे प्रशासनाचे विशेषत: आयआरसीटीसीचे अभिनंदन केले. लोकांनी हा दौरा करावा आणि त्यांचे अनुभव व्यापकपणे शेअर करावेत, असे आवाहन त्यांनी केले. त्यामुळे पंतप्रधानांचे ‘देखो अपना देश’ मोहीम आणि रामायण सर्किट यशस्वी होईल, असे यावेळी राज्यमंत्री ( Raosaheb Danve on Rampath Yatra special train ) रावसाहेब दानवे म्हणाले.

रामपथ स्पेशल रेल्वेला हिरवा कंदील
रामपथ स्पेशल रेल्वेला हिरवा कंदील

हेही वाचा-Burning Train In Morena : उधमपूर एक्सप्रेसच्या 4 डब्यांना लागली आग

मुख्य वैशिष्ट्ये-

रामपथ यात्रा ही तीर्थक्षेत्र विशेष पर्यटक ट्रेन ही अयोध्या, नंदीग्राम, वाराणसी, प्रयाग, शृंगावेरपूर आणि चित्रकूट यांसारख्या महत्त्वाच्या पर्यटन स्थळांचा समावेश करणारी सर्व-समावेशक टूर पॅकेज आहे. या तीर्थक्षेत्र विशेष पर्यटक ट्रेनचे ( Rampath Yatra special train booking service ) बुकिंग आयआरसीटीसीच्या वेबसाइटवर तसेच आयआरसीटीसीच्या विभागीय कार्यालये, प्रादेशिक कार्यालये आणि पर्यटक सुविधा केंद्रांवर ऑनलाइन केले जाते.

रामपथ स्पेशल रेल्वे रवाना
रामपथ स्पेशल रेल्वे रवाना

हेही वाचा-Unique Marriage : एकाच मंडपात सहा सख्ख्या बहिणींनी घेतले एकत्र फेरे, काढली घोड्यावरून वरात

अशी आहे पुणे-अयोध्या-पुणे रेल्वे

पुणे-अयोध्या-पुणे ही तीर्थक्षेत्र विशेष गाडी लोणावळा, पनवेल, कल्याण, नाशिक, मनमाड, चाळीसगाव, जळगाव, भुसावळ, खंडवा आणि इटारसी येथे प्रवाशांच्या चढण्यासाठी आणि उतरण्यासाठी थांबणार आहे. ( Facilities in Rampath Yatra special train ) अयोध्या आणि वाराणसी येथे पर्यटन थांबे देण्यात आले आहेत. ट्रेनची संरचना पाच तृतीय वातानुकूलित, पाच शयनयान, एक पॅन्ट्री कार आणि २ लगेज कम ब्रेक व्हॅन अशी आहे.

हेही वाचा-Lalu Prasad health अचानक तब्येत बिघडल्याने लालू प्रसाद यादव दिल्ली एम्समध्ये दाखल

कार्यक्रमाला या अधिकारी व नेत्यांची हजेरी-

कार्यक्रमाला पुणे महापालिकेचे महापौर मुरलीधर मोहोळ व आमदार सुनील कांबळे हे कार्यक्रमाला उपस्थित होते. महाव्यवस्थापक, मध्य रेल्वे मुंबई अनिल कुमार लाहोटी आणि आयआरसीटीसी अध्यक्षा आणि व्यवस्थापकीय संचालिका रजनी हसिजा या वेबलिंकद्वारे कार्यक्रमात सहभागी झाले होते. पुणे विभागाच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापक रेणू शर्मा तसेच मध्य रेल्वे आणि आयआरसीटीसीचे इतर वरिष्ठ अधिकारीदेखील पुणे स्थानकावरी कार्यक्रमात उपस्थित होते.

रेल्वेचे खासगीकरण होणार?

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव (Union Railway Minister Ashwini Vaishnav) म्हणाले, की भारत गौरव रेल्वेचा उद्देश हा पर्यटनाला प्रोत्साहन देणे आहे. भारत गौरव रेल्वेसाठी 180 हून अधिक रेल्वे (Allocation of more than 180 trains) राखीव ठेवण्यात आल्या आहेत. तर 3033 रेल्वे डबे (3033 Identity of Coaches) राखीव आहेत.

Last Updated : Nov 27, 2021, 3:57 PM IST

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.