ETV Bharat / city

Bakri Eid Special : पुण्याच्या लक्ष्मी बाजारात रॅम्बो बकऱ्याची चर्चा...पहा पुण्यातील रॅम्बो बकरा - रॅम्बो राजस्थानातून आला

पुण्यातील लक्ष्मी बाजारात राजस्थान येथून आलेल्या रॅम्बो बकरा पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिक हे गर्दी करताना दिसत ( goats demand Increased ) आहेत. या रॅम्बो बकऱ्याची उंची ही 7 फुटाची असून तो राजस्थान येथील कालपी येथून आला आहे. आणि त्याची किंमत ही 60 हजार रुपये आहे.अश्या या घोडयासारख्या दिसणाऱ्या आणि आकाराने असणाऱ्या रॅम्बोला बघण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने गर्दी करत आहेत.

Rambo Goat of Pune
पुण्यात रॅम्बो बकऱ्याची चर्चा
author img

By

Published : Jul 8, 2022, 4:29 PM IST

Updated : Jul 8, 2022, 5:36 PM IST

पुणे - मुस्लिम बांधवांच्या सणापैकी एक असलेल्या बकरी ईदचा ( Bakri Eid ) सण आठवड्यावर येऊन ठेपला आहे. त्यानिमित्त राज्यभरातून या सणासाठी जोरदार तयारी सुरू ( festival preparations starts ) आहे. बकरी ईदच्यानिमित्ताने लागणारे बोकड हे राज्यातील ठिकठिकाणाहून दाखल होते आहे. पुण्यातील भवानी पेठेतील लक्ष्मी बाजारात विक्रीसाठी आलेल्या रॅम्बो बकऱ्याची ( Rambo goat ) सध्या चर्चा होत आहे.

रॅम्बो बकऱ्याची चर्चा

रॅम्बो बकरा पाहण्यासाठी मोठी गर्दी - पुण्यातील लक्ष्मी बाजारात राजस्थान येथून आलेल्या रॅम्बो बकरा पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिक हे गर्दी करताना दिसत ( goats demand Increased ) आहेत. या रॅम्बो बकऱ्याची उंची ही 7 फुटाची असून तो राजस्थान ( Rambo From Rajasthan ) येथील कालपी येथून आला आहे. आणि त्याची किंमत ही 60 हजार रुपये आहे.अश्या या घोडयासारख्या दिसणाऱ्या आणि आकाराने असणाऱ्या रॅम्बोला बघण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने गर्दी करत आहेत.

बोकडांच्या मागणीत वाढ - गेली दोन वर्षे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वच सण उत्सव साध्या पद्धतीने साजरी करण्यात आले. पण यंदा कोरोनाचे संकट कमी झाल्याने सर्वच सण उत्सव मोठ्या उत्साहात साजरी होत आहेत. पुण्यातील भवानी पेठ येथील लक्ष्मी बाजारात देशभरातील तसेच राज्यातील औरंगाबाद, जालना, बीड, अहमदनगर, परभणी, मुंबई, कल्याण, ठाणे या ठिकाणांहून बोकडे विक्रीसाठी आणली जात आहेत. तसेच उस्मानाबादी गावरान बोकडाला देखील मोठ्या प्रमाणात मागणी आहे. साधारणतः 10 ते 12 हजारांपासून ते 25 हजारांच्या पुढे किमतीचे बोकड येथे विकण्यासाठी ठेवण्यात आले असल्याचे दिसून आले. तसेच 60 हजार, 1 लाख रुपये किमतीचे बोकडसुद्धा येथे विक्रीला आले आहे.

मोठ्या प्रमाणात बोकडे बाजारात दाखल - दोन वर्षानंतर बाजार सुरू झाला असला तरी यंदाच्या बोकड बाजारात म्हणावे तसे ग्राहक आले नाहीत. ईद रविवारी असल्याने मोठ्या प्रमाणात बोकड हे बाजारात दाखल झाले आहेत. पाऊस सुरू असल्याने नागरिक हे बाजारात कमी प्रमाणत येत असून ईदच्या एक ते दोन दिवसाआधी बाजारात गर्दी होणार असल्याचे यावेळी व्यापाऱ्यांनी सांगितले आहे.

हेही वाचा - Shiv Sena Chief Uddhav Thackeray Statement : शिवसेनेपासून धनुष्यबाण कोणीही हिरावू शकत नाही - उद्धव ठाकरे

Last Updated : Jul 8, 2022, 5:36 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.